मराठी बातम्या /बातम्या /Viral /वेगात चाललात किंवा धावलात तरीही या कपातून चहा-कॉफी सांडणार नाही, पाहा भन्नाट VIDEO

वेगात चाललात किंवा धावलात तरीही या कपातून चहा-कॉफी सांडणार नाही, पाहा भन्नाट VIDEO

खरं तर काहीही खाताना किंवा पिताना एका जागी शांत बसावं, असं आहारशास्त्र सांगतं. तरीही अशी फिरत-फिरत चहा-कॉफीची मजा घेण्याची सवय कित्येकांना असते.

खरं तर काहीही खाताना किंवा पिताना एका जागी शांत बसावं, असं आहारशास्त्र सांगतं. तरीही अशी फिरत-फिरत चहा-कॉफीची मजा घेण्याची सवय कित्येकांना असते.

खरं तर काहीही खाताना किंवा पिताना एका जागी शांत बसावं, असं आहारशास्त्र सांगतं. तरीही अशी फिरत-फिरत चहा-कॉफीची मजा घेण्याची सवय कित्येकांना असते.

  नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : चहाचा कप किंवा कॉफीचा मग (Tea or Coffee Mug) हातात घेऊन इकडे-तिकडे फिरण्याची किंवा काम करता करता चहा-कॉफी पिण्याची सवय अनेकांना असते. मात्र असं करताना कपातला चहा किंवा कॉफी सांडू नये म्हणून काळजी घ्यावी लागते आणि तरीही बऱ्याचदा चहा-कॉफी सांडतेच. आपण एखाद्या महत्त्वाच्या कामात असू, तर चहा-कॉफी सांडल्यानं (Coffee Spilling) आणखी चिडचिड होते. कारण कपडे खराब होतात आणि खाली जमिनीवर किंवा टेबलावर जिकडे हे पडलं असेल तिथली साफसफाईही हातातलं काम बाजूला ठेवून करावी लागते.

  खरं तर काहीही खाताना किंवा पिताना एका जागी शांत बसावं, असं आहारशास्त्र सांगतं. तरीही अशी फिरत-फिरत चहा-कॉफीची मजा घेण्याची सवय कित्येकांना असते. फिरताना चहा-कॉफी सांडून मजेचा विचका व्हायला द्यायचा नसेल, तर विज्ञानाचं एक मूलभूत तत्त्व अंमलात आणावं लागेल. या तत्त्वाच्या आधारे Unspillable Cup अर्थात चहा-कॉफी न सांडणारा कप अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. 'अॅक्शन लॅब शॉर्ट्स' (Action Lab Shorts) या यूट्यूब चॅनेलवर या संकल्पनेचा व्हिडिओ आहे. हा कप हातात घेऊन कितीही वेगात चाललं, तरीही त्यात असलेला चहा किंवा कॉफी खाली सांडत नाही. हे वैज्ञानिक तत्त्व अतिशय सोप्या पद्धतीने या व्हिडिओतून उलगडून दाखवण्यात आलं आहे.

  टाईट जिन्स घालून बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाणं पडलं महागात; तरुणीची झाली भयंकर अवस्था

  जेव्हा आपण द्रवपदार्थाने भरलेला कप हातात घेऊन चालतो तेव्हा आपल्या शरीरासोबत कपाला आणि कपातल्या द्रवालासुद्धा गती प्राप्त होते. आपल्या गतीची (Frequency) फ्रिक्वेन्सी (वारंवारिता) आणि द्रवपदार्थाची फ्रिक्वेन्सी एकमेकींशी जुळतात म्हणजेच मॅच होतात. त्यामुळे त्यांचे फोर्सेस एकमेकांना विरोध करतात आणि त्यातून तयार होणाऱ्या ऊर्जेमुळे द्रवपदार्थ कपातून बाहेर सांडतो. जर, कप आणि कपातला द्रवपदार्थ यांची फिरण्याची/गतीची दिशा एकच असेल, तर त्यांचे फोर्सेस एकमेकांना विरोध करणार नाहीत. त्यामुळे साहजिकच द्रवपदार्थ सांडणार नाही. या तत्त्वाचा वापर करण्यासाठी काँट्रॅप्शन अर्थात कप ठेवण्यासाठी एक साधन तयार करण्यात आल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे.

  " isDesktop="true" id="613348" >

  व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार, कप कॉन्ट्रॅप्शनवर ठेवला तर कप फिरवल्यानंतरही कपातला द्रवपदार्थ सांडत नाही. कारण त्यांची गती एकाच दिशेची असते. हा कप घेऊन अगदी ट्रेडमिलवर चाललो किंवा पायऱ्यांवरून भरभर धावलो तरीदेखील त्यातला द्रवपदार्थ खाली सांडत नाही. इतकंच काय, तो कप हातात घेऊन गोल फिरवला तरीही त्यातून काहीही सांडत नाही. व्हिडिओत त्याचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. ज्यांना इतर कामं करताना चहा-कॉफी पिण्याची सवय आहे, अशांसाठी हे तत्त्व उपयोगी ठरू शकतं.

  Cobra चा सर्पमित्रावर अचानक हल्ला; पाहा थरारक VIDEO

  या कपाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर अनेकांनी कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना या कपाचा शोध नक्कीच अनोखा वाटतो. कमेंट्समध्ये प्रेक्षकांनी ते मान्यदेखील केलं आहे. एकाने कमेंट केली आहे, की कपातला पदार्थ खाली सांडू नये म्हणून सर्वसामान्य माणसं त्यावर झाकण ठेवतात, पण या व्हिडिओतली व्यक्ती मात्र द्रवपदार्थ न सांडणारा कपच तयार करते. काहींना हा शोध क्रांतिकारक वाटतो आहे, तर काही जण व्हिडिओतल्या व्यक्तीच्या सादरीकरणाचे फॅन झाल्याचं कमेंट्समधून दिसतं आहे. काहींनी या कपाची मागणीही केली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Coffee, Tea