Home /News /viral /

भलतीच डेअरिंग करत थेट खतरनाक मगरीलाच मारली मिठी आणि...; तरुणाचं काय झालं तुम्हीच पाहा VIDEO

भलतीच डेअरिंग करत थेट खतरनाक मगरीलाच मारली मिठी आणि...; तरुणाचं काय झालं तुम्हीच पाहा VIDEO

मगरीला मिठी मारणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

  मुंबई, 04 ऑगस्ट : मगर किती क्रूर आणि हिंस्त्र शिकारी आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मगरीच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. अगदी क्षणभरात हा जीव आपल्या शिकारीची चिरफाड करतो यामुळेच पाण्यात राहून मगरीसोबत वैर कधीच घेऊ नये अं म्हटलं जातं. त्यामुळे भलेभले प्राणीही मगरीशी पंगा घ्यायला घाबरतात मात्र चक्क एका व्यक्तीने मगरीला मिठीच मारली आहे. पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. प्राणीही जवळ जायला घाबरतात अशा मगरीच्या जवळ जाण्याची हिंमत व्यक्तीने केलीच पण तिला आपल्या कुशीत, मिठीतही घेतलं. फक्त वाचूनच आपल्या अंगावर काटा येतो, हृदयाची धडधड वाढते. पण प्रत्यक्षात असं करणाऱ्या या तरुणाचं काय झालं असेल, हा विचार, ही कल्पनाही नकोशी वाटते. तरी त्याचं काय झालं असेल हे पाहवल्याशिवायही तुम्हाला राहवणार नाही. हे वाचा - VIDEO - बापरे! थेट मगरीच्याच पाठीवर जाऊन बसला तरुण आणि...; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी एक मगर शांत बसली आहे. एक व्यक्ती तिथं येतो आणि तो त्या मगरीच्या मानेत हात घालतो. मगर लगेच आपला जबडा उघडून त्या व्यक्तीच्या दिशेने आपलं तोंड करते. व्यक्ती मगरीला घट्ट धरतो. मगर आपलं शरीर जोरात हलवताना दिसते. तरी व्यक्ती तिला सोडत नाही. कसंबसं करून ती मगरीला आपल्या मांडीवर घेऊन बसते. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी तिला घट्ट मिठीही मारते.
  आता या व्यक्तीचं काही खरं नाही असं तुम्हाला वाटेल. पण  आश्चर्य म्हणजे मगर शांत आहे. ती त्या व्यक्तीला काहीच करत नाही. त्यामुळे व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हिंस्र मगर इतकी शांत कशी काय राहू शकते? मगरीने या व्यक्तीवर हल्ला का केला नाही? असे बरेच प्रश्न अनेक युझर्सना पडले. त्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत. तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील... हो की नाही? हे वाचा - खाणं द्यायला म्हणून गाडीची खिडकी उघडली, भुकेल्या वाघाने झडप घातली अन्...; थरारक VIDEO gatorboys_chris इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओतील व्यक्तीचं नाव क्रिस आहे. जी मगरी पाळते. त्यामुळेच मगरीसोबत त्याची चांगली मैत्री आहे. व्हिडीओत या मगरीशिवाय आणखी दोन मगरीही दिसतात.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या