Home /News /viral /

एका झटक्यात प्यायला 10 बिअर, अशी झाली ब्लॅडरची अवस्था; X-ray पाहून व्हाल हैराण

एका झटक्यात प्यायला 10 बिअर, अशी झाली ब्लॅडरची अवस्था; X-ray पाहून व्हाल हैराण

पोटात दुखायला लागलं म्हणून झाला अ‍ॅडमिट, रिपोर्ट पाहून डॉक्टरही झाले हैराण. पाहा फोटो

    बिजींग, 23 जून : बिअर पिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हल्ली काही बिअर भेसळयुक्त असतात, याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. असाच प्रकार चीनमध्ये घडला. चीनमध्ये एका इसमानं एकसाथ बिअरच्या 10 बॅटल्या प्यायला. त्यानंतर तब्बल 18 तास तो शौचास केला नाही. यासगळ्याचा परिणाम त्याच्या ब्लॅडरवर झाला. टाइम्स नाऊनं दिलेल्या माहितीनुसार, हा माणूस 40 वर्षांचा असून त्याचे नाव हू आहे. तो चीनच्या पूर्व प्रांतातील झेजियांग येथे राहतो. त्याच्या पोटात दुखी लागल्यामुळं तो डॉक्टरांकडे गेला, मात्र हॉस्पिटलमध्य गेल्यानंतर डॉक्टरांना वेगळाच संशय आला म्हणून त्याचा एक्स रे काढण्यात आला. त्यावेळी असे दिसून आले की लघवी खूप काळ थांबवल्यामुळं त्याच्या मुत्राशयावर याचा परिणाम झाला, आणि या व्यक्तीचे मुत्राशय फुटले. वाचा-कंबर दुखायला लागली म्हणून झाला अ‍ॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण वाचा-Shocking! स्वत:च्याच मुलामुळे गर्भवती झाली ही महिला यानंतर या व्यक्तीला ऑपरेशन करावे लागले. डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यानंतर त्याचे डॅमेज झालेले ऑर्गन ठिक केले. सध्या रुग्णांची प्रकृती ठीक असून, डॉक्टरांच्या मते फार क्वचित प्रसंगी असे होते. दरम्यान डॉक्टरांनी जास्त दारू प्यायल्यानंतर कधीच लघवी रोखून ठेवू नये, असा सल्ला दिला आहे. वाचा-महिलेच्या छातीत 30 तास घुसून राहिला चाकू, डॉक्टरांकडे नेलं आणि...
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या