नवी दिल्ली 02 एप्रिल : कोब्रा किंवा विषारी साप घरात आल्यावर एकच खळबळ उडते. पण अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात लोक मजेदार पद्धतीने साप पकडताना दिसतात. मात्र कधीकधी हे धोकादायकही ठरतं, कारण हे साप बऱ्याचदा माणसांना चावतातही. सध्या सापाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
Video : झोपलेल्या वाघाला बघताच स्तब्ध उभा राहिले हरिण, तेवढ्यात वाघ उठला आणि...
नुकताच हा व्हिडिओ एका यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती घरामध्ये बसलेला असतानाच त्याला घरात एक कोब्रा शिरल्याचं दिसतं. यानंतर अजिबातही न घाबरता त्याने मागून कोब्राची शेपटी पकडली आणि मग त्याला दोरीसारखं फिरवायला सुरुवात केली. जेव्हा साप फिरू लागला तेव्हा त्याने दुसऱ्या हाताने त्याचा फणाही पकडला.
seems like he done this way too many times pic.twitter.com/UIdnI2UyAy
— Humans Are Metal (@HumanAreMetal) March 28, 2023
एवढंच नाही तर त्याने कोब्राचं एक टोक उजव्या हाताने आणि दुसरं टोक डाव्या हाताने पकडलं. या व्यक्तीने नागाला पूर्णपणे ताब्यात घेतलं. व्हिडिओच्या शेवटच्या भागात तो आपल्या पंजाने कोब्राचा जबडा पूर्णपणे दाबून ठेवला असल्याचं दिसतं. हे दृश्यच अतिशय भीतीदायक वाटतं. किंग कोब्रा हा अतिशय विषारी नाग आहे, अशात तो चावल्यास या व्यक्तीचा जीवही जाऊ शकत होता.
शेवटी ती व्यक्ती घराचा दरवाजातून बाहेर पडत त्या नागाला बाहेर घेऊन जाते. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काही लोक त्या व्यक्तीवर संतापले आणि त्याने जीव धोक्यात घालून असा स्टंट केल्याचं म्हणू लागले. हा व्हिडिओ आतापर्यंत 45 हजारहून अधिकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी लाईकही केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: King cobra, Snake video