Home /News /viral /

VIDEO : हातात साधा पॅन घेऊन खतरनाक मगरीला मारायला गेले आजोबा; धक्कादायक शेवट

VIDEO : हातात साधा पॅन घेऊन खतरनाक मगरीला मारायला गेले आजोबा; धक्कादायक शेवट

हातात पॅन घेऊन खतरनाक मगरीसमोर आजोबा छाती ताणून उभे राहिले. शेवटी जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही.

    कॅनबेरा, 21 जून : मगरीसमोर भल्याभल्या प्राण्यांचाही टिकाव लागत नाही. अगदी बिबट्या, चित्ता अशा ताकदवान प्राण्यांची ताकदही मगरीसमोर कमी पडते. हे प्राणीसुद्धा मगरीची शिकार होतात (Crocodile video). अशा मगरीसमोर जाण्याची, तिच्याशी दोन हात करण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही. पण एका आजोबांनी मात्र छाती ताणत एका मगरीचा सामना केला आहे. शिकारीसाठी आलेल्या मगरीला घाबरून न जाता त्यांनी साध्या पॅनने वार केला. व्हिडीओ शेवट पाहून तुम्हाला धक्काच बसेल (Man Hit Crocodile with Frying Pan). मगरींचे तुम्ही बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. ज्यात मगर आणि माणसाचा आमनासामना झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मगरीशी लढा देणं वाटतं तितकं सोपं नाही. पण या वृद्ध व्यक्तीने ही हिंमत केली. मगरीशी दोन हात करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात ही व्यक्ती शिकारीसाठी आलेल्या मगरीवर साध्या फ्राय पॅनने हल्ला करताना दिसली. मगरीला पॅनने मारत ही व्यक्ती आपला बचाव करताना दिसली (Man Attacks Aggressive Crocodile with Pan). हे वाचा - VIDEO : व्यक्तीचं लक्ष नसताना अचानक मागून आला भलामोठा सिंह आणि...; कॅमेऱ्यात कैद झालं भयंकर दृश्य व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती एका ठिकाणी उभी आहे. माणसाला पाहताच एक मगर त्याच्या दिशेने धावत येते. आता मगर हल्ला करायला आली म्हटल्यावर कुणीही तिथून पळून जाईल. पण ही व्यक्ती मात्र तिथंच उभी राहिली. त्या व्यक्तीच्या हातात साधा पॅन आहे. जशी मगर त्याच्यावर हल्ला करणार तोच त्या व्यक्तीने आपल्या हातातील पॅन त्या मगरीच्या डोक्यावर मारला. दोन वेळा त्या व्यक्तीने पॅनने मगरीच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर मगर आल्या पावली परत गेली. व्यक्तीने हल्ला करताच मगर घाबरून पळून गेली. हे वाचा - मोठ्या माणसांनाही लाजवेल असं चिमुकल्याचं काम; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा VIDEO Airborne Solutions Helicopter Tours फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या गोट आइलँडमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्यक्तीचं नाव किंग काय आहे, जो एका पबचा मालक आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या