नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेला मेट्रोमधला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. हा व्हिडीओ माणूसकीची काय आहे हे समजावून सांगणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक मनुष्य मेट्रोमध्ये एक वृद्ध व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ भारतातला नसला तरी, 59 सेकंदात माणूसकीचं दर्शन घडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या अंगावरील कपडे काढून एका गरीब वयोवृद्ध व्यक्तीला देताना दिसत आहे.
मेट्रोमध्ये निवस्त्र फिरणाऱ्या या वृद्ध व्यक्तीकडे पाहून सर्व आश्चर्य व्यक्त करत होते, मात्र त्याच्या मदतीला कोणी आले नाही. अखेर एका व्यक्तीने आपले टी-शर्ट काढून वृद्ध व्यक्तीला दिले. मात्र ही व्यक्ती स्वत: हून टी-शर्टही घालू शकत नाही. यानंतर, या भल्या इसमानं स्वत: या वृद्ध व्यक्तीला कपडे घातले.
वाचा-LIVE रिपोर्टिंग करताना पत्रकार घाबरली, असं काय घडलं पाहा VIDEO
एवढेच नाही तर या इसमाने त्या वृद्ध व्यक्तीला आपली टोपीही घातली. हे पाहून मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी या मदत करणाऱ्या इसमाचे कौतुक केले.
वाचा-झूमवर क्लास सुरू असतानाच तरुणीच्या घरात घुसले चोर, लॅपटॉप बंद केला आणि...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.