नवी दिल्ली 29 सप्टेंबर : अनेकदा असं होतं, की एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये (Expensive Restaurant) जेव्हा आपण जेवण करण्यासाठी जातो तेव्हा फूट आयटम्सचे रेट न पाहताच ऑर्डर (Food Order) देतो. यूनायटेड किंगडमधील (United Kingdom) एका व्यक्तीसोबतही असंच झालं. या व्यक्तीनं लंडनमधील (London) सर्वात महागड्या हॉटेलमध्ये जेवण केलं. मात्र, जेव्हा त्यानं बिल पाहिलं तेव्हा तो थक्क झाला. त्याच्या अकाऊंटमध्ये जितके पैसे शिल्लक होते, तितकं हे बिल आलं होतं.
बापरे! या साबणाच्या किमतीत खरेदी करू शकाल सोन्याचा हार, यात इतकं काय आहे खास?
हा व्यक्ती लंडनच्या Nusr-Et Steakhouse नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते. Daily Mail च्या वृत्तानुसार, Salt Bae नावाच्या ठिकाणी असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर ज़मील अमीन (Jamil Amin) नावाच्या व्यक्तीनं आपली व्यथा सोशल मीडियावर (Social Media) सर्वांसमोर मांडली आहे. त्यानं बिलाची कॉपीही (Viral Bill) शेअर केली.
जमीलने Nusr-Et Steakhouse मध्ये चार जणांनी केलेल्या जेवणानंतर आलेल्या बिलाची कॉपी सोशल मीडियावर शेअर केली. या बिलातील रक्कम 1 लाख 82 हजारहून अधिक होती. हैराण करणारी बाब म्हणजे या बिलमध्ये दिसतं, की केवळ एका फूड आयटमची किंमत तब्बल 63 हजार रुपये आहे. ४ एनर्जी ड्रिंक रेड बुलची किंमतही सामान्य किमतीपेक्षा खूप अधिक होती. यासाठी त्यांनी 44 ब्रिटिश पाउंड घेतले. यानंतर रेस्टॉरंटनं यात आपले सर्व्हिस चार्जही जोडले होते. हे सर्व्हिस चार्ज तब्बल 24 हजार रुपये होते. जमीलनं ही पोस्ट शेअर करत लिहिलं, की माझा पूर्ण बँक बॅलन्स एकाच रात्री संपला.
काठीनं बदडत माकडानं घडवली कुत्र्याला अद्दल; हा मजेशीर VIDEO एकदा बघाच
जमीलनं ही कॉपी Twitter आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकताच ती प्रचंड व्हायरल झाली. अशा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानं अनेकांनी त्याच्यावर टीका केली. आतापर्यंत ही पोस्ट 10 हज़ारहून अधिकांनी लाईक केली आहे. काही लोकांनी कमेंट करत म्हटलं, की हे बिल खरंच थक्क करणारं आहे. एका यूजरनं सवाल केला, की हे गोल्डन बर्गर होतं का? की जगातील सर्वात चांगलं बर्गर होतं? अनेकांनी 24 हजार रुपये सर्व्हिस चार्जवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Restaurant, Viral news