मराठी बातम्या /बातम्या /Viral /कौतुकास्पद! 5 कोटीची लॉटरी जिकूंनही स्वतःसाठी नाही ठेवला एकही रुपया, या भल्या कामासाठी खर्च केले पैसे

कौतुकास्पद! 5 कोटीची लॉटरी जिकूंनही स्वतःसाठी नाही ठेवला एकही रुपया, या भल्या कामासाठी खर्च केले पैसे

पीटर चार्लटननं टॅट्स लोट्टो लॉटरीच्या माध्यमातून पाच लाख पाउंड म्हणजेच तब्बल पाच कोटी रुपये जिंकले. मात्र, ही रक्कम स्वतःकडे ठेवणं त्यांना योग्य वाटत नव्हतं.

पीटर चार्लटननं टॅट्स लोट्टो लॉटरीच्या माध्यमातून पाच लाख पाउंड म्हणजेच तब्बल पाच कोटी रुपये जिंकले. मात्र, ही रक्कम स्वतःकडे ठेवणं त्यांना योग्य वाटत नव्हतं.

पीटर चार्लटननं टॅट्स लोट्टो लॉटरीच्या माध्यमातून पाच लाख पाउंड म्हणजेच तब्बल पाच कोटी रुपये जिंकले. मात्र, ही रक्कम स्वतःकडे ठेवणं त्यांना योग्य वाटत नव्हतं.

नवी दिल्ली 29 सप्टेंबर : एखाद्याला 5 लाखाची लॉटरी लागली तरी त्याचा आनंद गगनात मावणार नाही. कारण हे कोणत्याही मेहनतीशिवाय नशिबानं मिळालेले पैसे असतात. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पीटर चार्लटनबाबत (Peter Charleton) असं घडलं नाही. त्यांनी लॉटरीमध्ये 5 कोटी रुपये जिंकले (man win Rs 5 Crore in Lottery). मात्र, यातील एकही रुपया त्यांनी स्वतःसाठी खर्च केला नाही.

आता तुम्ही विचार करत असाल की जर पीटरनं हे पैसे स्वतःवर खर्च केले नाहीत, तर त्यानं हे नेमके कुठे खर्च केले. याच उत्तर जाणून या ऑस्ट्रेलियन (Australia) व्यक्तीबद्दल तुमच्या मनात आदर निर्माण होईल. पीटरनं लॉटरीतून मिळालेले सर्व पैसे गरजू मित्रांना, अनोळखी लोकांना आणि कोरोनामुळे आर्थिक परिस्थितीत ढासळलेल्या लोकांना वाटले. त्यांनी स्वतः आपली कहाणी लोकांसोबत शेअर केली.

रेस्टॉरंटचं बिल पाहून युवकाला बसला धक्का; एका रात्रीत रिकामं झालं बँक अकाउंट

पीटर चार्लटननं टॅट्स लोट्टो लॉटरीच्या माध्यमातून पाच लाख पाउंड म्हणजेच तब्बल पाच कोटी रुपये जिंकले. मात्र, ही रक्कम स्वतःकडे ठेवणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. याच कारणामुळे गरजू आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या लोकांना हे पैसे वाटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांना लवकरात लवकर ही रक्कम संपवायची होती. यासाठी त्यांनी हा पर्याय शोधला. त्यांनी हे लॉटरीचं तिकिट आपले चुलते चार्ली यांच्या आठवणीत विकत घेतलं होतं. त्यांचं काहीच काळाआधी निधन झालं आहे.

का रे दुरावा! हनिमूनसाठी आयर्लंडला गेलं कपल; विमानतळावरच घडलं असं काही की...

द सनच्या वृत्तानुसार, पीटर चार्लटन यांनी 7News YouTube Channel सोबत बातचीत करताना सांगितलं, की त्यांची आपल्या चुलत्यांसोबत खूप जवळीक होती. त्यांच्या आठवणीत खरेदी केलेल्या या तिकिटातून लॉटरी जिंकल्यानंतर पीटनं सांगितलं, की त्यांना असं वाटत होतं, की ते सोन्याच्या खजिन्यावर बसलेले आहेत आणि त्यांना यापासून मुक्ती मिळवायची आहे. त्यांनी आपल्या मित्रांच्या आणि कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे टाकले. त्यांनी आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या आणि गरजूंना हे पैसे देण्यासाठी मेसेज पाठवले. सुरुवातीला लोकांना हे फेक वाचलं कारण आपल्यासोबत धोका होईल अशी भीती त्यांना होती. यानंतर त्यांनी पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये पैसे देत गरजूंची मदत करण्यास सुरुवात केली. पीटरचं म्हणणं आहे, की यामुळे त्यांना भरपूर आनंद मिळाला.

First published:
top videos

    Tags: Lottery, Viral news