Home /News /viral /

Oh no! वाघाचे कान खेचायला गेला आणि पिंजऱ्यात अडकला हात; तरुणाचं काय झालं पाहा VIDEO

Oh no! वाघाचे कान खेचायला गेला आणि पिंजऱ्यात अडकला हात; तरुणाचं काय झालं पाहा VIDEO

वाघाला त्रास देण्यासाठी व्यक्तीने त्याच्या पिंजऱ्यात हात टाकला तो बाहेरच येईना.

  मुंबई, 06 जुलै : काही लोक असे असतात ज्यांना मुक्या जीवाला त्रास द्यायला आवडतं. कुत्रा, मांजर अशा प्राण्यांचा छळ ते करतातच पण पिंजऱ्यात बंद असलेल्या हिंस्र प्राण्यांशीही मस्ती करण्यापासून स्वतःला रोखत नाही आणि याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Tiger video viral). व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल (Man hands stuck in the bars tiger caged). एका तरुणाने चक्क वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला. शांत बसलेल्या वाघाला तो त्रास देऊ लागला. कधी शेपटी खेच, कधी कान खेच... वाघाला असं त्रास देताना त्या तरुणाचाच हात अचानक त्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर मात्र त्याला चांगलाच घाम फुटला. आपला जीव वाचवण्यासाठी तो धडपडू लागला. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. waleedalqasimi  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओत पाहू शकता एका पिंजऱ्यात एक वाघ अगदी शांत बसला आहे. पिंजऱ्याच्या अगदी दरवाजाजवळ तो आहे. एक व्यक्ती या पिंजऱ्याजवळ येते आणि पिंजऱ्यात हात टाकते. वाघाचं तोंड त्या दिशेने आहे, त्याचं लक्ष या व्यक्तीकडे नाही. याचाच फायदा ही व्यक्ती घेते आणि आपली डेअरिंग दाखवायला जाते. हे वाचा - ...अन् छोट्याशा बछड्यासमोर वाघिणीची हवा टाईट; नेमकं काय घडलं पाहा VIDEO सुरुवातीला ती वाघाच्या शेपटीला हात लावते. त्यानंतर वाघाच्या कानाला स्पर्श करते. वाघ काहीच करत नाही म्हणून ती व्यक्ती पुन्हा पुन्हा वाघाच्या कानाला हात लावत राहते. कानावर माशी बसावी आणि ती उडवावी तसा वाघही कान उडवतो.
  त्यानंतर ही व्यक्ती आपला हात पिंजऱ्यातून बाहेर काढायला जाते तेव्हा तिचा हात पिंजऱ्यातच अडकतो आणि त्याची हवा टाईट होते. जीव वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. हात खेचण्याचा प्रयत्न करतो पण हात एकाच फटक्यात बाहेर येत नाही. बऱ्याच वेळाने त्याचा हात पिंजऱ्याबाहेर येतो, तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव येतो आणि पिंजऱ्यापासून तो लगेच दूर जातो. हे वाचा - जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून फरफटत नेलं, भयानक VIDEO सुदैवाने वाघ शिकारीच्या मूडमध्ये नाही, त्याचं पोट भरलेलं असावं म्हणून तो शांत बसला आहे. त्यामुळे ही व्यक्ती वाचली. जर वाघ चवताळला असता आणि त्याची नजर या व्यक्तीवर पडली असती तर काही खरं नव्हतं.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या