Home /News /viral /

स्वतःचा जीव धोक्यात घालून मगरीला वाचवायला ड्रेनेज पाईपमध्ये उतरला व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा, Shocking Video

स्वतःचा जीव धोक्यात घालून मगरीला वाचवायला ड्रेनेज पाईपमध्ये उतरला व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा, Shocking Video

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस मगरीला वाचवत असल्याचं दिसतं. तो ज्यापद्धतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून मगरीच्या जवळ जातो, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल

  नवी दिल्ली 12 एप्रिल : तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असाल तर दररोज तुम्हाला कित्येक नवनवे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असतील. यात प्राण्यांच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. त्यातही प्राण्यांचे भीतीदायक आणि हल्ल्याचे व्हिडिओ अधिक पाहिले जातात. यात मगरीचाही विशेष समावेश आहे. मगर हा पाण्यातील सर्वात भयंकर जीव असल्याचं म्हटलं जातं. कारण मगरीच्या तावडीत सापडल्यास जिवंत परत येणं, जवळपास अशक्य असतं. मगरीच्या हल्ल्याचे व्हिडिओ (Crocodile Attack Videos) सतत समोर येत असतात. मात्र सध्या समोर आलेला व्हिडिओ अतिशय वेगळा आहे. खाद्य देण्यासाठी गेलेल्या तरुणीचा हात जबड्यात पकडून मगरीने पाण्यात खेचलं, अंगावर काटा आणणारा VIDEO नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस मगरीला वाचवत असल्याचं दिसतं. तो ज्यापद्धतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून मगरीच्या जवळ जातो, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. साधारणपणे कोणीही मगरीच्या आसपास जायला घाबरतं आणि तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेण्याचा प्रयत्न करतं. कारण मगरीचा एकच हल्ला कोणत्याही माणसाला जीवघेणी दुखापत करू शकतो.
  View this post on Instagram

  A post shared by UNILAD (@unilad)

  सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ मात्र अतिशय वेगळा आहे. यात दिसतं की एक भलीमोठी मगर ड्रेनेज पाईपमध्ये शिरते, मात्र नंतर तिला यातून बाहेर पडणं शक्य होत नाही. यानंतर एक व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून आतमध्ये जातो आणि या मगरीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागतो. VIDEO: लग्नाच्या स्टेजवर नवरदेव भलत्याच कामात झाला मग्न; भडकलेल्या नवरीने मंडपातच घडवली अद्दल हा व्यक्ती मगरीला वाचवण्यासाठी स्वतःही ड्रेनेज पाईपमध्ये उतरतो. यानंतर मगर या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी त्याच्या मागे मागे जाऊ लागते. मगर हल्ला करण्यासाठी पुढे सरकू लागताच हा व्यक्ती पाईपमधून बाहेर पडण्यास सुरुवात करतो. हा व्हिडिओ अतिशय भीतीदायक आणि थरकाप उडवणारा आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crocodile, Shocking video viral

  पुढील बातम्या