नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) हॉटेल इंडस्ट्रीला (Hotel Industry) वर्षभरापासून मोठा फटका बसला. लॉकडाउन (Lockdown) काळातील निर्बंध हळू-हळू शिथिल करण्यास सुरुवात केल्यानंतर पुन्हा हॉटेल सुरू झाली, पण येणाऱ्या ग्राहकांची संख्या पूर्वीप्रमाणे नव्हती. अशात एखाद्या कस्टमरने हॉटेलमधील स्टाफला लाखोंची टीप दिली तर? एका व्यक्तीने आर्थिकदृष्ट्या थंड पडलेल्या या काळात हॉटेलमधील वेटर्सला मोठी टीप दिली आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा (Florida) येथील ही घटना आहे. इथे Wahoo Seafood Grill रेस्टॉरेंटमध्ये आलेल्या एका व्यक्तीने जेवण ऑर्डर केलं, आरामात बसून तो जेवला. त्याचं बिल 140 युरो म्हणेज जवळपास 1400 रुपये झालं. पण ज्यावेळी बिल भरण्याची वेळ आली, त्यावेळी त्याने बिलाशिवाय आणखी लाखो रुपयांची टीप रेस्टॉरेंटमधील स्टाफसाठी ठेवली. या घटनेनंतर रेस्टॉरेंटमध्ये काम करणारा स्टाफ अतिशय भावूक झाला.
1400 बिल, 7 लाखाची टीप -
द मिररने दिलेल्या रिपोर्टनुसार, हा व्यक्ती फ्लोरिडाच्या रेस्टॉरेंटमध्ये पोहोचला. तो तिथे जेवला आणि बिल मागितलं. बिल 1400 रुपये झालं होतं. त्यानंतर त्या व्यक्तीने रेस्टॉरेंटमध्ये असलेल्या सर्व स्टाफला डायनिंग एरियामध्ये बोलवलं आणि त्यांच्या मेहनतीसाठी, त्यांनी दिलेल्या वागणुकीसाठी त्यांचे आभार मानले. त्यानंतर त्याने टीप म्हणून 7 लाख 13 हजार रुपये दिले. पैसे केवळ दिले नाही, तर या पैशाचा किती वाटा प्रत्येकाने घ्यायचा हेदेखील त्याने सांगितलं. 75 हजार रुपये प्रत्येक स्टाफने घेण्याचं त्याने सांगितलं. त्या व्यक्तीने अशाप्रकारे टीप दिल्यानंतर स्टाफला या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नव्हता. कोरोना, लॉकडाउनच्या कठीण काळात त्या व्यक्तीच्या या कृत्याने सर्वजण अतिशय भावूक झाले होते.
रेस्टॉरेंटमधील मालकाने शेअर केला हा किस्सा -
ही संपूर्ण घटना रेस्टॉरेंट मालकाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं बिलही अटॅच केलं आहे. 'या व्यक्तीने आम्हाला सर्वांना आश्चर्यचकित केलं. वर्षभर या इंडस्ट्रीसाठी आर्थिकदृष्ट्या चांगलं गेलं नाही, पण या घटनेनंतर माणुसकीवरील विश्वास अधिक वाढला असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.