मुंबई, 12 सप्टेंबर : सर्वच पालक आपल्या पाल्याप्रति जागरूक असतात. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठीप्रत्येक पालकाला काळजी असते. प्राणी, पक्षांमध्येही हे प्रेम, काळजी आपल्याला पाहायला मिळते. याचाच प्रत्यय एका व्हिडिओ वरून येतो. सहा वर्षे जुना हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाइल्ड लाईफ ऍड या युट्युब चॅनलवरील हा व्हिडिओ आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि, एका राजहंसाचे पिल्लू थॉमस नदीच्या किनारी एका जाळीत अडकले होते. वाइल्ड लाईफ ऍड या युट्युब चॅनलचे प्रेसेंटर आणि फाउंडर सिमोन कॉवेल यांनी या पिलाला त्या जाळ्यातून काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका मोठ्या राजहंसाने त्यांच्यावर हल्ला बोल केला. आपल्या पिलांच्या सुरक्षेसाठी त्याने ही भूमिका घेतली. सहा वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आता कार्यकारी जनसंपर्क अधिकारी डॅनी डेरेनी यांनी 2020 मध्ये ट्विटरवर शेअर केला आहे . या व्हिडिओला त्यांनी राजहंस पिलांच्या सुरक्षेसाठी आई झाली माता, असे कॅप्शन दिले आहे.
हे वाचा-या महिलेनं 3 मिनिटांत संपवले 10 डोनट्स, कोरोना काळात बनवला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याला 1.5 लाख लाईक्स तर 38 हजार रीट्वीट मिळाले आहेत. एका वयक्तीने यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, राजहंस सुंदर आहे पण गंभीर इजा करण्याची त्यात ताकद आहे. अन्य एकाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि,पक्षी माणसांची माणुसकी समजतात त्यामुळे या राजहंसाने माघार घेतली.
राजहंसाने सिमनचे सर्व प्रयत्न बघितले. पक्षांच्या कायम ते लक्षात राहतात. ट्विटर वरील सकारात्मक बाबींचा प्रसार करणारे हँडल ब्युटेनगेबीडन्टने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला 38 हजार लाईक्स मिळाले आहे. ब्युटेनगेबीडन्ट एक प्रसिद्ध हँडल आहे. त्याचे दीड लाख फॉल्लोवेर्स आहेत. नेदरलँड येथील सॅनडर या व्हिडिओ बाबत म्हणाला की, पृत्येक हिरो सुरक्षा प्रदान करत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ खूप वेगळा आणि अनोखा आहे.