मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पठ्ठ्याने खराब प्लास्टिकपासून बनवलं अदृश्य पेंटिंग, मोबाईलशिवाय बघताच येणार नाही!

पठ्ठ्याने खराब प्लास्टिकपासून बनवलं अदृश्य पेंटिंग, मोबाईलशिवाय बघताच येणार नाही!

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या (Technology) युगात प्रत्येक जण नवीन काही तरी करण्याच्या प्रयत्नात असतो. काही लोक जन्मजात प्रतिभावान असतात. राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यात राहणाऱ्या अशाच एका तरुणाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे कुठलेही शिक्षण घेतलेले नसताना एक अनोखे पेटिंग (Invisible Painting) तयार केले आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 23 डिसेंबर : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या (Technology) युगात प्रत्येक जण नवीन काही तरी करण्याच्या प्रयत्नात असतो. काही लोक जन्मजात प्रतिभावान असतात. राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यात राहणाऱ्या अशाच एका तरुणाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे कुठलेही शिक्षण घेतलेले नसताना एक अनोखे पेटिंग (Invisible Painting) तयार केले आहे. या तरुणाने कोणतेही रंग न वापरता हे पेंटिंग तयार केले आहे. जितेंद्र चरण असे तरुणाचे नाव असून त्याचे वय 27 वर्ष आहे. या तरुणाने खराब झालेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि पोलराइज्ड शीटपासून हे पेटिंग तयार केले आहे. हे पेटिंग अदृश्य असून ते पोलराइज्ड शीटच्या माध्यमातून पाहिले तरच दिसते.

जितेंद्रला तंत्रज्ञानाची आणि नवनवीन प्रयोग करण्याची फार आवड आहे. त्याने एम.कॉम. केले असून सध्या तो कपड्याचा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वीच जितेंद्रने साड्यांचे पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करून एक पेंटिंग तयार केलं आहे. खास बाब म्हणजे, पेटिंग फिरवल्यानंतर त्यात वेगवेगळे रंग दिसतात. जितेंद्रने आपला राष्ट्रध्वज तिरंग्याचं पेटिंग तयार केलं आहे. तिरंग्याचे तीन रंग दिसण्यासाठी त्याने 3 वेगवेगळ्या शीट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला आहे. विशिष्ट प्रकारच्या चष्म्यातूनच हे पेटिंग पाहता येतं.

अयोध्यामध्ये उभारण्यात येत असलेले राम मंदिर, मंडाफियातील श्री सांवरिया सेठ आणि चित्तौडगड संग्रहालयासाठी जितेंद्र वीरपुत्र महाराणा प्रताप यांचं ६०० चौरस फुटाचं पेटिंग तयार करणार आहे. हे पेटिंग एका खास चष्म्यातूनच दिसेल. पेटिंग पाहण्यासाठी वापरण्यात येणारी टेक्नॉलॉजी जितेंद्रच्या मोबाईलमध्ये आहे. त्यातून त्याने आपण तयार केलेल पेटिंग दाखवलं. हे तंत्रज्ञान फक्त त्याच्या फोनमध्येच आहे.

जितेंद्रचे अदृश्य मोबाईल तयार करण्याचं स्वप्न असून त्यावर तो काम करत आहे. यावर संशोधन करत असतानाच त्याला वेगवेगळ्या डायरेक्शनवर विविध रंग दिसले. यातूनच त्याने असे अनोखे पेटिंग तयार केले. लवकरच अदृश्य फोन तयार होईल, असे त्याने सांगितले. जिचा फोन आहे, तिच व्यक्ती हा फोन वापरू शकेल, इतर व्यक्ती तो वापरू शकणार नाही, असेही त्याने सांगितले.

देशात बलात्काराच्या वाढत्या घटना पाहता तो मुलींच्या सुरक्षेसाठी मिनी गर्ल्स सेफ्टी ब्रेसलेट (Mini Girls Safety Bracelet) तयार करत आहे. हे एक खास ब्रेसलेट असणार आहे. कोणत्याही व्यक्तीने मुलीला स्पर्श केल्यानंतर संबंधित व्यक्तीला 0.010 अँपिअर 220 वॅटचा करंट लागेल. या ब्रेसलेटमध्ये आपत्कालीन बटण असणार असून ते दाबल्यास कुटुंबियांना मुलीचे लोकेशन आणि कॉल जाईल. तसेच मुलगी कोणत्या स्थितीमध्ये आहे, हेही या ब्रेसलेटमुळे कळेल.

यापूर्वी जितेंद्रने घराचे चोरांपासून संरक्षण करण्यासाठी बेल इंडिकेटर सेफ्टी डिव्हाईसही बनवले आहे. यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यात मदत होते. हे सेफ्टी डिव्हाईस बनवल्यानंतर त्याला अनेक धमक्या आल्याचे त्याने सांगितले. यानंतर त्याला एका महिन्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात आले होते. याशिवाय जितेंद्रने सुरक्षा उपकरणं, सुरक्षा स्टिक आणि पोलिसांच्या सुरक्षेसाठी वायरलेस चार्जरदेखील तयार केले आहेत.

First published: