मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मॅकडोनाल्डच्या चिकन बर्गरपासून त्यानं बनवलं चक्क आइस्क्रीम, पाहा मजेदार व्हायरल VIDEO

मॅकडोनाल्डच्या चिकन बर्गरपासून त्यानं बनवलं चक्क आइस्क्रीम, पाहा मजेदार व्हायरल VIDEO

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. एका पाकिस्तानी व्यक्तीची क्रिएटिव्हिटी लोकांनी उचलून धरली आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. एका पाकिस्तानी व्यक्तीची क्रिएटिव्हिटी लोकांनी उचलून धरली आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. एका पाकिस्तानी व्यक्तीची क्रिएटिव्हिटी लोकांनी उचलून धरली आहे.

  • Published by:  News18 Desk
लाहोर, 16 फेब्रुवारी : सोशल मीडियावर (social media) जगभरातल्या लोकांनी दाखवलेल्या क्रिएटिव्हिटीचे व्हिडिओज प्रचंड पाहिले जातात. हे व्हिडिओ अगदीच मिनिटभरात लोकप्रिय होतात. विशेषतः पाककलेचे व्हिडिओज (food video) सोशल मीडिया युजर्समध्ये लोकप्रिय होतात. आताही असाच एक अनोखा व्हिडिओ व्हायरल (viral video) झाला आहे. मॅकडोनाल्ड्स (MC Donald's) हे ग्लोबल चेन असलेलं फूड जॉईंट. लोकांना मॅक डोनाल्ड्सचं चिकन बर्गर आणि आईस्क्रीम (MC Chicken burger and ice-cream) दोन्ही खूप आवडतं. मात्र पाकिस्तानातील एका व्यक्तीनं (man from Pakistan) या दोन्ही पदार्थांना एकत्र आणत भन्नाट क्रिएटिव्हिटी(awesome creativity)  दाखवली आहे. ती पाहून लोक अक्षरश: चकीत झाले आहेत. लोकांचं हेसुद्धा म्हणणं आहे, की हा व्हिडीओ पाहिल्यावर मॅक डोनाल्ड चिकन बर्गर बनवणंच बंद करून टाकेल. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. यात या पाकिस्तानी व्यक्तीनं चिकन बर्गरपासून आइस्क्रीम (Chicken burger ice-cream) बनवलं आहे. व्हिडिओ पाहिल्यावर हरेकजण हाच विचार करतो आहे, की या बर्गरची चव (taste) नेमकी कशी असेल? याशिवाय लोक हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर मजेदार मीम्स (memes) आणि जोक्ससुद्धा शेअर करत आहेत. (हे वाचा'Sorry Love, मी तुझं बर्गर खाल्लं'; Uber Eats च्या Delivery Boyचा तरुणीला मेसेज) सोशल मीडियावर हा व्हिडिओ @darshanpathak नावाच्या युजरनं शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यानं कॅप्शनसुद्धा लिहिलं, की 'हे पाहून मॅकडोनाल्ड्स नेहमीसाठी चिकन मॅक बंद करून टाकेल. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, की ही व्यक्ती सुरुवातीला चिकन मासिक बर्गर बॉक्समधून काढते आणि मग तिचे बारीक-बारीक तुकडे करते. यानंतर तो त्यात दूध आणि क्रीम मिसळतो. अशाप्रकारे तो या मिश्रणाचं आईस्क्रीम बनवतो.
First published:

Tags: Food, Pakistan, Viral video.

पुढील बातम्या