मराठी बातम्या /बातम्या /Viral /घराच्या पोटमाळ्यातून यायचे विचित्र आवाज; उघडून पाहताच सरकली तरुणाच्या पायाखालची जमीन

घराच्या पोटमाळ्यातून यायचे विचित्र आवाज; उघडून पाहताच सरकली तरुणाच्या पायाखालची जमीन

एका व्यक्तीला स्वतःच्या घरात भीती वाटू लागली. बरेच दिवस त्याला त्याच्या घराच्या पोटमाळ्यातून आवाज येत असे. आधी त्याला वाटलं की उंदीर असेल. पण हे आवाज थांबण्याचं नाव घेत नव्हते.

एका व्यक्तीला स्वतःच्या घरात भीती वाटू लागली. बरेच दिवस त्याला त्याच्या घराच्या पोटमाळ्यातून आवाज येत असे. आधी त्याला वाटलं की उंदीर असेल. पण हे आवाज थांबण्याचं नाव घेत नव्हते.

एका व्यक्तीला स्वतःच्या घरात भीती वाटू लागली. बरेच दिवस त्याला त्याच्या घराच्या पोटमाळ्यातून आवाज येत असे. आधी त्याला वाटलं की उंदीर असेल. पण हे आवाज थांबण्याचं नाव घेत नव्हते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 24 मार्च : एखाद्या व्यक्तीसाठी त्याचं घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण असतं. या घरात दिवसभराचा थकवा निघून जातो. कितीही त्रास झाला तरी घरी आल्यावर सर्व ठीक वाटतं. पण हे घर तुम्हाला घाबरवत असेल तर? होय, वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला स्वतःच्या घरात भीती वाटू लागली. बरेच दिवस त्याला त्याच्या घराच्या पोटमाळ्यातून आवाज येत असे. आधी त्याला वाटलं की उंदीर असेल. पण हे आवाज थांबण्याचं नाव घेत नव्हते. याशिवाय त्या व्यक्तीला नेहमी असं वाटायचं की कोणीतरी आपल्यासोबत राहत आहे. जेव्हा त्याने हे तपासण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

स्कूल बस चालवतानाच चालकाला आला Heart Attack; 13 वर्षीय मुलाने असा वाचवला सगळ्यांचा जीव..VIDEO

डेव्हिस वाह्लमनने कधीही विचार केला नाही की त्याला त्याच्या घरात अशी एखादी गोष्ट सापडेल, जी कदाचित त्याला आयुष्यभर घाबरवेल. डेव्हिसला त्याच्या घराच्या पोटमाळ्यावरून सतत आवाज येत असे. आधी त्याने या आवाजांकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा हे आवाज मोठे होऊ लागले, तेव्हा त्याने तपासायचं ठरवलं. डेव्हिसला दरवाजा बंद असल्याचं आढळलं. त्याने जबरदस्तीनं तो उघडला तेव्हा समोरचा दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. वास्तविक, एक महिला त्याच्या घरात बराच काळ राहत होती.

डेव्हिसने या घटनेबद्दल लोकांना सांगितलं की, त्याला त्याच्या घरात इतर कोणी राहात असल्याची कल्पना नव्हती. डेव्हिस जेव्हा घराच्या पोटमाळ्यात पाहण्यासाठी गेला तेव्हा त्याला तेथील दरवाजा बंद असल्याचे दिसले. त्याने घाबरून दरवाजा ठोठावला. एका महिलेनं दरवाजा उघडला तेव्हा तो थक्क झाला. या महिलेने जिमीचे कपडे घातले होते. तिने डेव्हिसकडे पाहिले आणि विचारले की तो जिमी आहे का? आपल्याच घरात राहणाऱ्या एका अनोळखी स्त्रीला पाहून डेव्हिस अस्वस्थ आणि आश्चर्यचकित झाला.

डेव्हिसने या घटनेबद्दल आणखी एक विचित्र गोष्ट शेअर केली. डेव्हिसने महिलेला तिची ओळख विचारली असता तिने सांगितलं की ती इथे राहते आणि गेल्या तीन दिवसांपासून हे तिचं घर आहे. खाली उतरून डेव्हिसने प्रथम पोलिसांना बोलावलं. मात्र पोलीस येण्यापूर्वीच महिलेने तिथून पळ काढला. डेव्हिस म्हणतात की पोलिसांनी येण्यास उशीर केला. तर पोलिसांचं म्हणणं आहे, की ते अवघ्या 6 मिनिटांत तिथे पोहोचले. बाकी काहीही असलं तरी डेव्हिसला अजूनही खात्री नाही की त्याने जे पाहिलं ते मानव होतं की भूत? मात्र तीन दिवसांपासून त्या व्यक्तीनं आपलं घर त्याच्यासोबत शेअर केलं होतं.

First published:
top videos

    Tags: Shocking news, Viral news