मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मासे पकडायला गेला पण जाळ्यात अडकलं भलतंच काही; पाहताच अवाक झाला तरुण

मासे पकडायला गेला पण जाळ्यात अडकलं भलतंच काही; पाहताच अवाक झाला तरुण

नेदरलँडचा मार्टिन ग्लॅट्ज नदीत मासे पकडण्यासाठी गेला होता. बऱ्याच वेळानंतर फिशिंग रॉड जड झाल्यानं मासा जाळ्यात अडकल्याचं त्यांना समजलं

नेदरलँडचा मार्टिन ग्लॅट्ज नदीत मासे पकडण्यासाठी गेला होता. बऱ्याच वेळानंतर फिशिंग रॉड जड झाल्यानं मासा जाळ्यात अडकल्याचं त्यांना समजलं

नेदरलँडचा मार्टिन ग्लॅट्ज नदीत मासे पकडण्यासाठी गेला होता. बऱ्याच वेळानंतर फिशिंग रॉड जड झाल्यानं मासा जाळ्यात अडकल्याचं त्यांना समजलं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : तुम्ही कधी तलावात किंवा नदीमध्ये मासे पकडायला (Fishing in river) गेला असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की हे किती धैर्याचं काम आहे. मात्र, जेव्हा जाळ्यात मासा अडकतो तेव्हा काहीतरी मोठं युद्ध जिंकल्यासारखं वाटतं. सध्या नेदरलँडच्या एका व्यक्तीची बातमी चांगलीच चर्चेत (Viral News) आहे. हा व्यक्ती मासे पकडण्यासाठी गेला होता. जाळ्यात काहीतरी अडकल्याचं समजताच त्यानं जाळं वरती खेचलं मात्र बाहेर येताच यात जे दिसलं ते पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. सध्या या व्यक्तीचा आणि माशाचा फोटो व्हायरल होत आहे.

VIDEO: आधी लगावले जोरदार ठुमके, मग ढसाढसा रडू लागली नवरी; कारण जाणून व्हाल हैराण

नेदरलँडचा मार्टिन ग्लॅट्ज नदीत मासे पकडण्यासाठी गेला होता. बऱ्याच वेळानंतर फिशिंग रॉड जड झाल्यानं मासा जाळ्यात अडकल्याचं त्यांना समजलं. त्यानं पाहिलं की या जाळ्यात एक मोठा केळ्याप्रमाणे पिवळ्या रंगाचा मासा अडकला आहे. त्यानं हा मासा बाहेर काढला आणि त्याला पाहून अवाक झाला. कारण हा मासा एक कॅट फिश (Rare Catfish) होता. मात्र, यातही पिवळ्या रंगाचा कॅट फिश (Yellow Catfish) अतिशय दुर्मिळ असतो. तो एक वेल्स कॅटफिश होता. जो पूर्ण युरोपमध्ये अगदी सहज आढळतो. हा मासा 2.7 मीटरपर्यंत लांब असू शकतो.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मार्टिननं म्हटलं, की त्यानं कधीच असा पिवळ्या रंगाचा कॅट फिश पाहिला नव्हता. हा दुर्मिळ कॅट फिश लियुसिज्मचा परिणाम आहे. लियुसिज्म एक प्रकारची जेनेटिक डिसॉर्डर असते. यामुळे प्राण्यांच्या शरीराचा रंग बदलतो.

वाह रे पठ्ठ्यांनो..! रस्त्यावरच रंगली चिमुकल्यांची कुस्ती; हा VIDEO एकदा बघाच

ही डिसॉर्डर अॅलबिनिस्मपेक्षा वेगळी आहे, कारण यात डोळ्यांचा रंग बदलत नाही. यात प्राण्यांचा रंग इतका भडक होतो की ते आपल्या शिकाऱ्याला अगदी सहज दिसतात आणि त्यांना लपून राहाणंही कठीण जातं. मार्टिननं हा मासा पाण्याबाहेर काढला आणि मासा पाहून इतका इम्प्रेस झाला की त्यानं लगेचच या माशाला पुन्हा पाण्यात सोडलं. त्याला विश्वास आहे, की हा मासा यापेक्षाही खूप मोठा होईल.

First published:

Tags: Fish, Viral news