Home /News /viral /

Google Map च्या मदतीने व्यक्तीने शोधला हरवलेला मुलगा; पार्कमधील कचरापेटीत दिसलं डोकं

Google Map च्या मदतीने व्यक्तीने शोधला हरवलेला मुलगा; पार्कमधील कचरापेटीत दिसलं डोकं

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती गुगल मॅपवर पार्कमध्ये हरवलेल्या एका मुलाला शोधताना दिसतो.

  नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : आधुनिक जगात टेक्नलॉजीच्या क्षेत्रात भरपूर विकास झाला आहे. एकेकाळी एखाद्या नवीन ठिकाणी जायचं म्हटलं की आपल्याला रस्ता विचारण्यासाठी लोकांची गरज भासत असे. मात्र आता गुगल मॅपचा (Google Map) वापर करून लोक अगदी सहज एखाद्या अनोळखी ठिकाणी पोहोचतात. मात्र, काही अशी प्रकरणंही समोर येतात ज्यांना गुगल मॅपमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. अजब प्रेम की गजब कहाणी! 80 वर्षीय आजोबांनी 84 वर्षीय GFला पळवलं; झाली जेल कारण.. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती गुगल मॅपवर पार्कमध्ये हरवलेल्या एका मुलाला शोधताना दिसतो. हे पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले. हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक व्यक्ती गुगल मॅपवर लोकेशन सर्च करत पार्कमधील एका कचरापेटीत अडकलेल्या मुलाला शोधतो (Child Trapped in Dustbin). द गुगल अर्थ गाय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टिकटॉक यूजरने पार्स एक विचित्र शोध सोशळ मीडियावर शेअर केला आहे. यात एका मुलाचा काहीसा अस्पष्ट व्हिडिओ पाहायला मिळतो. यात मुलाचं डोकं गोल हिरव्या रंगाच्या कचरापेटीमधून बाहेर आल्याचं दिसतं. हे पाहून सगळेच हैराण झाले आहेत. सध्या हे समोर आलेलं नाही की गा मुलगा इथे कसा पोहोचला आणि डस्टबिनमध्ये का शिरला.

  VIDEO - रेल्वेचालकाने हद्दच केली; आपले चोचले पुरवण्यासाठी थांबवली ट्रेन आणि...

  एका रिपोर्टनुसार, टिकटॉक यूजरचा हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. व्हिडिओ पाहून लोक हैराणही आहेत आणि हा मुलगा कचरापेटीत अडकल्याचं पाहून नेटकऱ्यांना हसूही आवरत नाहीये. अनेकांचं असं म्हणणं आहे की कदाचित हा मुलगा लपंडाव खेळत असावा, याच कारणामुळे तो डस्टबिनमध्ये लपला असेल.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking news, Viral photo

  पुढील बातम्या