मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बाथरूममध्ये सापडला करोडो रुपयांचा खजिना; व्यक्तीने पुढे जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही

बाथरूममध्ये सापडला करोडो रुपयांचा खजिना; व्यक्तीने पुढे जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही

ज्या व्यक्तीला टॉयलेटमध्ये इतकी मोठी रक्कम मिळाली तो एक प्लंबर होता. तो टॉयलेटमधील भिंतीचं काम करत होता.

ज्या व्यक्तीला टॉयलेटमध्ये इतकी मोठी रक्कम मिळाली तो एक प्लंबर होता. तो टॉयलेटमधील भिंतीचं काम करत होता.

ज्या व्यक्तीला टॉयलेटमध्ये इतकी मोठी रक्कम मिळाली तो एक प्लंबर होता. तो टॉयलेटमधील भिंतीचं काम करत होता.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 13 डिसेंबर : अनेकदा माणसाला विचार केलेला नसतानाही इतकं काही मिळतं, ज्याचा त्याने कधी विचारही केलेला नसतो. देणारा जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. काही लोक काहीही मेहनत न करता अचानक श्रीमंत होतात. हे बहुतेकदा तेव्हा होतं, जेव्हा एखाद्याला लॉटरी (Lottery) लागते किंवा पैशांनी भरलेली बॅग सापडते. सध्या असंच एक अनोखं प्रकरण अमेरिकेच्या टेक्सासमधून समोर आलं आहे. यात एका व्यक्तीला टॉयलेटमध्ये तब्बल 4 कोटी रूपये मिळाले (Man Found 4 Crore Rupees in Toilet).

3 वर्षांपूर्वी निधन झालेले वडील अचानक Google Map वर दिसले; पाहून शॉक झाली महिला

ज्या व्यक्तीला टॉयलेटमध्ये इतकी मोठी रक्कम मिळाली तो एक प्लंबर होता. तो टॉयलेटमधील भिंतीचं काम करत होता. यासाठी त्याने ही भिंत तोडण्यास सुरुवात केली आणि यानंतर जे काही दिसलं ते पाहून तो हैराण झाला. 2014 साली Lakewood Church मधून 6 लाख डॉलर चोरी झाले होते. जस्टिन कॉले नावाचा हा प्लंबर जेव्हा चर्चमधील बाथरूमची भिंत रिपेअर करत होता, तेव्हाच त्याचं नशीब बदललं. काम करताना त्याला असं जाणवलं की या भिंतीच्या आतमध्ये काहीतरी लपवलं गेलं आहे.

भिंतीचं प्लास्टर काढताच त्याला तिथे चार कोटी रुपये कॅश आणि चेकच्या स्वरुपात आढळले. हे पाहून तो हैराण झाला आणि विचारात पडला की असं कसं होऊ शकतं. यानंतर त्याने असा निर्णय घेतला की यातील एक रुपयाही तो आपल्या घरी घेऊन जाणार नाही.

द गार्जियनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, या प्लंबरने अतिशय प्रामाणिकपणा दाखवला. त्याने ही संपूर्ण घटना चर्च प्रशासनाला सांगितली आणि ही संपूर्ण रक्कम चर्च मॅनेजमेंटकडे दिली. हे सर्व पैसे टॉयलेटच्या भिंतीमध्ये लपवण्यात आले होते. सध्या चर्च प्रशासनाने या प्लंबरच्या प्रामाणिकपणामुळे खूश होऊन त्याला बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे. चर्चच्या भिंतीमध्ये आढळलेल्या पैशांमधील काही रक्कम जस्टिनला दिली गेली आहे.

पहिल्यांदा डेटवर गेलेल्या तरुणीने सांगितला विचित्र अनुभव; युवकाने केलं अजब कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, है पैसे तब्बल सात वर्षांपूर्वी चर्चमधूनच चोरी झाले होते. खूप शोधूनही हे पैसे मिळाले नाहीत. आता टॉयटलेटच्या भिंतीमध्ये हे पैसे आढळले. चर्चने लाखो रुपये क्राईम स्टॉपर्स नावाच्या एका एजंसीला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जेव्हा कंपनीला जस्टिनच्या प्रामाणिकपणाबद्दल समजलं तेव्हा हे पैसे जस्टिनला देण्यात आले. इतकंच नाही तर चर्चनेही म्हटलं की जस्टिनचा प्रामाणिकपणा बघता त्याला बक्षीस म्हणून पैसे दिले जातील. जस्टिनने सांगितलं की त्याची अनेक थकीत बिलं भरण्यासाठी हे पैसे त्याच्या कामी येणार आहेत.

First published:

Tags: Money, Viral news