लग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं

लग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं

एका व्यक्तीनं आपल्यात सासरच्या लोकांवर फसणूक करून लग्न लावल्याचा आरोप केला आहे. एका ट्रान्सजेंडरसोबत (Transgender) आपलं लग्न (Marriage) लावलं गेलं असल्याचं त्यानं तक्रारीत म्हटलं आहे

  • Share this:

लखनऊ 22 जून: एका व्यक्तीनं आपल्यात सासरच्या लोकांवर फसणूक करून लग्न लावल्याचा आरोप केला आहे. एका ट्रान्सजेंडरसोबत (Transgender) आपलं लग्न (Marriage) लावलं गेलं असल्याचं त्यानं तक्रारीत म्हटलं आहे. तरुणानं आपल्या तक्रारीत म्हटलं, की 28 एप्रिल रोजी त्याचं लग्न झालं. मात्र, लग्नानंतर त्याला सत्य समजलं. या व्यक्तीनं असा दावा केला आहे, की त्याच्या पत्नीच्या काही अंगांचा विकास झालेला नाही. यामुळे तो पत्नीसोबत शारीरिक संबंध (Sexual Relations) ठेवू शकला नाही. ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे.

भरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL

या व्यक्तीनं सांगितलं, की आपल्या पत्नीचं मेडिकल परीक्षण करण्यासाठी गेले असता त्यांना समजलं, की त्याची पत्नी ट्रान्सजेंडर आहे. पोलीस निरीक्षक कुंज बिहारी मिश्रा यांनी सांगितलं, की शास्त्री नगर इथल्या रहिवाशानं जिल्ह्यातील पनकी क्षेत्रातील एका महिलेसोबत लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नानंतर आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यात तिला अडचणी येत असल्याचं समोर आलं आणि या महिलेनं सांगितलं, की तिला आरोग्यविषयक काही अडचणी आहेत. मात्र, बराच काळ गेल्यानंतर युवकाला संशय आला. अखेर तो आपल्या पत्नीला चेकअपसाठी घेऊन गेला. स्त्रीरोग विशेषतज्ञांकडे गेला असता त्याला समजलं, की त्याची पत्नी ट्रान्सजेंडर आहे.

असं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा? नवरदेवाला लगावली कानशिलात

रविवारी या पतीला आपल्या पत्नीबाबतचं सत्य समजलं. यानंतर त्यानं नवरी, तिचे आई-वडील, आणि मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

Published by: Kiran Pharate
First published: June 22, 2021, 3:44 PM IST

ताज्या बातम्या