Home /News /viral /

पाण्यातून दुचाकी चालवण्याच्या प्रयत्नात होता व्यक्ती; घडली भयंकर दुर्घटना, अपघाताचा LIVE VIDEO

पाण्यातून दुचाकी चालवण्याच्या प्रयत्नात होता व्यक्ती; घडली भयंकर दुर्घटना, अपघाताचा LIVE VIDEO

या व्हिडिओमध्ये (Bike Stunt in Water) एक व्यक्ती पाण्यावर दुचाकी चालवून स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र पाण्यावर चालणं अशक्य आहे, ही बाब तितकीच खरी.

  नवी दिल्ली 02 मे : कोणतंही काम करताना परिपूर्णता आवश्यक असते. यासोबतच काय करता येणं शक्य आहे आणि काय नाही याची पुरेशी जाणीव असायला हवी. माणसाला पाण्यावर चालता येत नाही हे तुम्हाला माहीत असेलच, पण असूनही तुम्ही असं करण्याचा प्रयत्न केलात तर त्यात अपयशालाच सामोरे जावं लागेल. सोशल मीडियावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट व्हिडिओ पाहिले असतील, जे अनेकदा व्हायरल होतात. हे व्हि़डिओ हैराण करणारे असतात. VIDEO: अचानक नदीचं पाणी वाढलं आणि पुरात अडकला कार चालक; पुढे जे घडलं ते हादरवून सोडणारं कारण स्टंटमॅन असे स्टंट करतात, जे पाहूनच अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ (Stunt Video Viral) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये (Bike Stunt in Water) एक व्यक्ती पाण्यावर दुचाकी चालवून स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र पाण्यावर चालणं अशक्य आहे, ही बाब तितकीच खरी. या व्यक्तीला वाटलं की बाईकचं स्पीड जास्त असल्यावर तो अगदी सहज पाण्यावरुन आपली गाडी चालवून ते पार करेल. मात्र, त्याचा हा अंदाज चुकीचा ठरला.
  View this post on Instagram

  A post shared by 7'nci Vites (@7ncivites)

  तो अगदी वेगात बाईक चालवत पाण्यात शिरतो खरा, मात्र काही अंतरावर जाताच त्याचा बॅलन्स बिघडतो आणि तो भयंकर पद्धतीने खाली कोसळतो. इतकंच नाही तर यात त्याच्या डोक्यावरील हेल्मेटदेखील निघून पडतं. सुदैवाने तो पाण्यातच कोसळतो, त्यामुळे त्याला जास्त मार लागत नाही. मात्र जर तो जमिनीवर कोसळला असता तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. कारण दुचाकीचा वेगही खूप जास्त होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बाईक स्टंटच्या नादात हा व्यक्ती कशाप्रकारे खाली कोसळतो. रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला केलं लग्नासाठी प्रपोज, पण नको ते घडलं, VIDEO हैराण करणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 7ncivites नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 4.5 मिलियन म्हणजेच 45 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, ५२ हजारहून अधिकांनी लाईकही केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने मस्करी करत लिहिलं, 'हे पाहिल्यानंतर 3 पिढ्या माझ्या पाठीचा कणा दुखत राहील'. आणखी एकाने लिहिलं, 'नक्कीच याची मान तुटली असणार'.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Stunt video

  पुढील बातम्या