Home /News /viral /

घाणेरड्या पाण्यापासून चपलांना वाचवायला गेला अन् त्याच पाण्यात धाडकन कोसळला, VIDEO VIRAL

घाणेरड्या पाण्यापासून चपलांना वाचवायला गेला अन् त्याच पाण्यात धाडकन कोसळला, VIDEO VIRAL

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता, की रस्त्यावर पावसाचं खराब पाणी वाहत आहे. अशात एक बॉस दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की मध्ये लाकडाची एक फळी ठेव, जेणेकरून त्याच्या चपला भिजणार नाहीत.

    नवी दिल्ली 07 ऑगस्ट : इंटरनेटवर तुम्ही सक्रीय असाल तर दररोज तुम्हाला निरनिराळे व्हायरल व्हिडिओ (Viral Videos) पाहायला मिळत असतील. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे तर काही हैराण करणारे असतात. तर, काही व्हिडिओ असे असतात ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. सध्या असाच एक अवघ्या 15 सेकंदाचा व्हिडिओ (Funny Video) चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. एखाद्याला जमिनीवर कोसळताना पाहून हसणं, ही वाईट गोष्ट आहे, हे खरं. मात्र, अनेकदा लोकं स्वतःच्या हितासाठी इतरांना त्रास देतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात पाहायला मिळतं, की एक व्यक्ती स्वतःच्या चपला भिजण्यापासून वाचवण्यासाठी दुसऱ्याला कामाला लावतो. मात्र, पुढे असं काही घडतं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पाहुण्यांसमोरच नव्या नवरीचा पतीसोबत रोमान्स; पाहा कपलचा Romantic Video व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रस्त्यावर पावसाचं खराब पाणी वाहत आहे. अशात एक बॉस दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की मध्ये लाकडाची एक फळी ठेव, जेणेकरून त्याच्या चपला भिजणार नाहीत. समोरचा व्यक्तीही हे ऐकता आणि त्या बॉससाठी लाकडाची फळी त्याठिकाणी ठेवतो. मात्र, बॉस यावर पाय ठेवताच जोरात घसरून जमिनीवर आदळतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्विमिंग पूलखाली NASA ने वसवलं दुसरं जग, पाण्याच्या आत घर, रस्ते आणि गाड्या! हा व्हिडिओ @lnstant_regret_ नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला गेला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की बॉसला आपल्या चपला ओल्या होऊ द्याययच्या नव्हत्या. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 7 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Video viral

    पुढील बातम्या