अनेकदा मस्ती करणं अतिशय धोकादायक ठरतं. या घटनेतही असंच घडलं. ही घटना चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणावर घडली. धरणातून सतत पाणी वाहत राहातं. याच धरणाच्या भल्यामोठ्या भिंतीवर वाहत्या पाण्यावरुन चढण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करू लागला. तो अर्ध्याहून जास्त अंतर चढला होता आणि खाली उभे असलेले लोक त्याच्याकडे टक लावून पाहत होते. काही लोक त्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवत होते, पण नंतर एक अशी घटना घडली ज्याने सगळेच घाबरले (Man Fell Down from Wall of Dam). घटनेचा धक्कादायक व्हिडिओही (Shocking Video) समोर आला आहे. सिंहासोबत करत होता मस्ती; भडकलेल्या जंगलाच्या राजाने हात जबड्यात पकडला अन्.., Shocking Video चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणावर उपस्थित नागरिक पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा आनंद घेत होते. इतक्यात धरणाच्या सरळ भिंतीवर एक तरुण सुमारे 30 फूट चढून गेला. हा एक अतिशय धोकादायक आणि प्राणघातक स्टंट होता. काही अंतर चढून गेल्यावर तोल सांभाळता न आल्याने तो घसरून खाली पडला. हा व्यक्ती खाली पडल्याचा व्हिडिओ कोणीतरी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. या तरुणाचा जीव वाचला मात्र त्याला मोठी दुखापत झाली.या घटनेनंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.कर्नाटक : धरणाच्या भिंतीवर स्टंटबाजी करणं पडलं महागात; तोल जाताच खाली कोसळला तरुण pic.twitter.com/j90AbuFb4v
— News18Lokmat (@News18lokmat) May 23, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral