मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बायकोच्या चपलांमुळे तुटली हाडे; पतीनं दाखल केला खटला, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निकाल

बायकोच्या चपलांमुळे तुटली हाडे; पतीनं दाखल केला खटला, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निकाल

उंचीवरुन पडल्यामुळे या व्यक्तीची अनेक हाडे तुटली. यानंतर भडकलेल्या पतीनं आपली पत्नी जूडी खौरी हिच्याविरोधात खटला दाखल केला

उंचीवरुन पडल्यामुळे या व्यक्तीची अनेक हाडे तुटली. यानंतर भडकलेल्या पतीनं आपली पत्नी जूडी खौरी हिच्याविरोधात खटला दाखल केला

उंचीवरुन पडल्यामुळे या व्यक्तीची अनेक हाडे तुटली. यानंतर भडकलेल्या पतीनं आपली पत्नी जूडी खौरी हिच्याविरोधात खटला दाखल केला

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : घरात अनेकदा असं होतं की आपण पायातील चपला काढल्यानंतर त्या बाजूला किंवा व्यवस्थित ठेवणं विसरून जातो. अनेकदा यामुळे कुटुंबातील सदस्य यात अडकून पडतातही. मात्र, आतापर्यंत कोणीही याविरोधात कोर्टात धाव घेतली नसेल. अमेरिकेच्या (United States) ओहायोमध्ये राहणाऱ्या जॉन वॉलवर्थसोबतही (John Walworth) अशीच विचित्र घटना (Weird Incident) घडली. मात्र, यानंतर त्याला राग अनावर झाला. यानंतर या व्यक्तीनं वकिलाच्या मदतीनं आपल्याच पत्नीविरोधात खटला दाखल केला. मुलाच्या एका चुकीमुळे पालटलं पित्याचं नशीब; रातोरात झाला 7 कोटी 50 लाखाचा मालक जॉन वॉलवर्थसोबत जे घडलं ती सामान्य बाब होती. मात्र, ही घटना मोठी यामुळे झाली कारण चपलेत अडकल्यानंतर जॉन पायऱ्यांवरुन खाली कोसळला. उंचीवरुन पडल्यामुळे या व्यक्तीची अनेक हाडे तुटली. यानंतर भडकलेल्या पतीनं आपली पत्नी जूडी खौरी हिच्याविरोधात खटला दाखल केला. पतीचं असं म्हणणं होतं, की या घटनेमुळे त्याचं शारीरिक नुकसान झालंच, मात्र सोबत मेडिकल बिलमुळे त्याला आर्थिक फटकाही बसला आहे. जॉन वॉलवर्थ आणि जूडी खौरी ओहायोमध्ये राहतात. फेब्रुवारी 2018 मध्ये ही घटना घडली तेव्हा त्यांचं लग्नही झालं नव्हतं. तो तळघरातून व्हिनेगरचा एक मग वरती आणण्यासाठी आपल्या होणाऱ्या पत्नीची मदत करत होता. याचदरम्यान पत्नीच्या चपलेमध्ये त्याचा पाय अडकला आणि तो पायऱ्यांवरुन खाली कोसळला. या घटनेत त्याचे हात, पाय आणि खांद्याची हाडे फ्रॅक्चर झाली. याच घटनेनंतर जॉननं होणाऱ्या पत्नीविरोधात खटला दाखल करत म्हटलं, की तिच्या हलगर्जीपणामुळे मला ६० लाखाचं मेडिकल बिल भरावं लागलं. इतकंच नाही तर यामुळे कामावरही न जाऊ शकल्यानं माझं 14 लाखाचं नुकसान झालं. पैशासाठी वृद्ध महिलेनं निवडला विचित्र पर्याय; वर्षभरात झाली करोडपती जॉनला पूर्णपणे बरं होण्यास अनेक महिने लागले. अखेर ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी आपल्या वकिलाच्या मदतीनं जूडीविरोधात खटला दाखल केला. पतीनं आरोप केला, की जूडीनं घरात धोकादायक स्थिती निर्माण केली आणि आपल्या घरातील पाहुण्यांची काळजी घेण्यात ती अपयशी ठरली. जूडीनं आपली बाजू मांडत म्हटलं, की ती आपल्या चपला दरवाजाच्या मागे ठेवत असे. तिच्या होणाऱ्या पतीलाही ही बाब माहिती होती. सोबतच ही घटना चपलांमुळेच घडली हेदेखील खात्रीशीर माहिती नसल्याचं तिनं म्हटलं. तीन जजच्या खंडपीठानं या प्रकरणावर सुनावणी करत जॉनची याचिका फेटाळून लावली. आणखी एक हैराण करणारी बाब म्हणजे या केसचा निकाल येण्याआधी एप्रिल 2019 मध्येच या कपलनं लग्नही केलं.
First published:

Tags: Viral news

पुढील बातम्या