मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! भूकेल्या मगरींना हाताने घास भरवायला गेला व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा, VIDEO

Shocking! भूकेल्या मगरींना हाताने घास भरवायला गेला व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा, VIDEO

हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले. मगरीसमोर जाण्याआधी सिंहदेखील विचार करतो मात्र एक व्यक्ती महाकाय मगरींसमोर बसून त्यांना खायला घालताना या व्हिडिओमध्ये दिसतं.

हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले. मगरीसमोर जाण्याआधी सिंहदेखील विचार करतो मात्र एक व्यक्ती महाकाय मगरींसमोर बसून त्यांना खायला घालताना या व्हिडिओमध्ये दिसतं.

हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले. मगरीसमोर जाण्याआधी सिंहदेखील विचार करतो मात्र एक व्यक्ती महाकाय मगरींसमोर बसून त्यांना खायला घालताना या व्हिडिओमध्ये दिसतं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 मार्च : ज्याप्रमाणे सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटलं जाते, त्याचप्रमाणे मगरीला 'पाण्याचा राजा' म्हटलं जातं. म्हणूनच लोक म्हणतात की पाण्यात राहून मगरीसोबत दुश्मनी कधीच घेऊ नये. मगरी अतिशय निर्दयी शिकारी असतात. त्यांच्या जबड्यात अडकल्यालस त्या जीवाचं जिवंत सुटणं जवळपास अशक्य आहे. हा धोकादायक प्राणी काही मिनिटांत आपल्या शिकारीची चिरफाड करतो. सध्या मगरीशी संबंधित असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video of Crocodile) झाला आहे.

बाईक काही स्टार्ट झाली नाही पण...; 'पापा की परी'च्या जबरदस्त कीकचा VIDEO VIRAL

हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले. मगरीसमोर जाण्याआधी सिंहदेखील विचार करतो मात्र एक व्यक्ती महाकाय मगरींसमोर बसून त्यांना खायला घालताना या व्हिडिओमध्ये दिसतं. व्हायरल झालेला हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीच्या काठावर एक माणूस हाताने मगरींना खाऊ घालत आहे (Feeding to Crocodile). हे खरोखरच थक्क करणारं दृश्य आहे.

View this post on Instagram

A post shared by WooGlobe (@wooglobe)

आपण पाहू शकता की तो व्यक्ती मगरीला अन्न देताना तिच्या डोक्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे या महाकाय मगरी व्यक्तीवर हल्लाही करत नाहीत. हा व्यक्तीदेखील त्यांच्यासमोर निर्भयपणे बसतो. हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा आहे, मात्र तो काळजाचा ठोका चुकवणारा आहे.

मानव आणि मगरींचा हा धक्कादायक व्हिडिओ wooglobe नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हे आश्चर्यकारक आहे की ही व्यक्ती खरोखरच हाताने मगरींना खाऊ घालत आहे.' 2 मार्चला अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 47 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

धक्कादायक! लिफ्टमध्ये मालकिणीसोबत...; पाळीव श्वानाचं भयंकर कृत्य CCTV मध्ये कैद

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने मजेशीर कमेंट करत लिहिलं की, 'ये बंदा तो रियल हीरो है. मी खात्रीने सांगू शकतो की पुढच्या व्हिडिओमध्ये याला हात किंवा पाय नसतील.' आणखी एका युजरने लिहिलं 'तुम्ही कोणत्याही वन्य प्राण्यावर, विशेषत: मगरींवर अजिबात विश्वास ठेवू शकत नाही'.

First published:

Tags: Crocodile, Shocking video viral