Home /News /viral /

फोटोचा नाद अंगलट, तोल जाऊन धबधब्यात वाहून गेला तरूण, काळजाचा ठोका चुकवणारा Video व्हायरल

फोटोचा नाद अंगलट, तोल जाऊन धबधब्यात वाहून गेला तरूण, काळजाचा ठोका चुकवणारा Video व्हायरल

फोटोचा नाद अंगलट, तोल जाऊन धबधब्यात वाहून गेला तरूण, काळजाचा ठोका चुकवणारा Video व्हायरल

फोटोचा नाद अंगलट, तोल जाऊन धबधब्यात वाहून गेला तरूण, काळजाचा ठोका चुकवणारा Video व्हायरल

Man falls into waterfall: तामिळनाडूमधील कोडाईकनाल जिल्ह्यामध्ये एक 28 वर्षीय तरूण फोटो काढण्याच्या नादात तोल जाऊन धबधब्यात कोसळला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

    मुंबई, 5 ऑगस्ट: अलीकडच्या काळातील तरूणाई उत्साहाच्या भरात अशा काही गोष्टी करते, ज्या कधीकधी त्यांच्या अंगलट येतात. नको ते साहस करण्याच्या प्रयत्नात अनेक तरूण-तरूणींना आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक धक्कादायक घटना घडली तामिळनाडूमधील कोडाईकनाल जिल्ह्यामध्ये....येथील एका धबधब्यावर फोटो काढण्याच्या नादात एक 28 वर्षीय तरूण तोल जाऊन धबधब्यात कोसळला आणि पाण्याच्या प्रवाहात (Man falls into waterfall) वाहून गेला.  काळजाचा ठोका चुकवणारी ही संपूर्ण घटना तरुणाच्या मित्राच्या कॅमेरात कैद झाली आहे. धबधब्यात पडून बेपत्ता झालेल्या या दुर्दैवी तरूणाचं नाव अजय पंडियन असे अजूनही तो सापडलेला नाही. अग्निशमन दलाच्या बचाव पथकाकडून या तरुणाचा शोध सुरु आहे. दरम्यान काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तामिळनाडूमधील कोडाईल जिल्ह्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. अजय पंडियन नावाचा युवक फोटोसाठी पोज देताना धबधब्यात पडला आणि बेपत्ता. ही संपूर्ण घटना त्याच्या मित्राच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजय धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन तो विविध पोज देत असल्याचं दिसत आहे. दरम्यान तो पोझ करत करत धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हेही वाचा- Bima Yojana: दरमहा फक्त 1 रुपये जमा करा, सरकार देईल 2 लाख रुपयांचा लाभ यादरम्यान तो आपल्या मित्राला व्यवस्थित फोटो घेण्यासाठी इशारेदेखील करत असल्याचं दिसत आहे. नंतर तो एक मोठा दगड उतरून खाली जाताना दिसत आहे. मित्रदेखील त्याचं शूट घेण्यासाठी त्याला फॉलो करत असल्याचं करतो. दरम्यान विविध पोज देत असतानाच अचानक अजयचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो धबधब्यात पडला. त्यानं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केल्याचंही दिसत आहे, मात्र तो प्रवाहाच वाहून गेला. हे होत असताना अजयचा मित्र कल्याणसुंदरमच्या किंचाळण्याचा आवाज रेकॉर्ड झाला आहे. घडलेल्या घटनेची माहिती कल्याणसुंदरमने स्थानिक पोलीसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून बचाव पथकामार्फत अजयचा शोध घेण्यात येत आहे, मात्र अजूनही शोधमोहिमेला यश मिळालं नाही.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Shocking viral video, Social media, Viral video.

    पुढील बातम्या