मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : सायकलवर बसून स्टंट करताना चाकातच घातला हात अन्...; पाहा तरुणासोबत पुढे काय घडलं

VIDEO : सायकलवर बसून स्टंट करताना चाकातच घातला हात अन्...; पाहा तरुणासोबत पुढे काय घडलं

सुरुवातीला या मुलाला पाहून असं वाटतं की तो आरामात स्टंट करेल. मात्र नंतर भलतंच काहीतरी घडतं.

सुरुवातीला या मुलाला पाहून असं वाटतं की तो आरामात स्टंट करेल. मात्र नंतर भलतंच काहीतरी घडतं.

सुरुवातीला या मुलाला पाहून असं वाटतं की तो आरामात स्टंट करेल. मात्र नंतर भलतंच काहीतरी घडतं.

  नवी दिल्ली 05 डिसेंबर : स्टंट करणं प्रत्येकालाच जमत नाही. स्टंट करण्यासाठी लोक भरपूर श्रम घेतात, सराव करतात आणि अखेर त्यात परफेक्ट होतात. चित्रपटांमध्येही तुम्ही अनेक असे स्टंट पाहिले असतील जे पाहूनच सगळे हैराण होतात. चित्रपटांमध्ये एक तर स्टंट मॅन (Stunt Man) ठेवले जातात, जे अभिनेत्यांना याचं ट्रेनिंग देतात. मात्र अनेकदा सामान्य लोकही कोणत्याही ट्रेनिंगशिवाय स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. अशात अनेकदा हे लोक स्वतःलाचा अडचणीत आणतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Stunt Video Viral) होत आहे. यात एका मुलासोबत स्टंट करत असताना भलतंच काहीतरी घडतं. सुरुवातीला या मुलाला पाहून असं वाटतं की तो आरामात स्टंट करेल. मात्र नंतर भलतंच काहीतरी घडतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ब्लू पॅन्ट आणि ग्रीन टी-शर्ट घातलेला तरुण सायकलवर येतो. यानंतर तो हँडलच्या बाजूला उभा राहात स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. उभा राहून तो सायकलचं पुढचं चाक हाताने पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो अपयशी ठरतो आणि धाडकन तोंडावर आपटतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ragib_afzal नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. लोकांच्या हा व्हिडिओ किती पसंतीस उतरत आहे याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की आतापर्यंत 3.8 मिलियन म्हणजेच 38 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 1 लाख 34 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे.
  या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, वाह काय सीन आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, जेव्हा ब्रेक फेल होतो, तेव्हा असंच करतात. आणखी एकाने लिहिलं, अतिशय मुर्ख माणूस आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Stunt video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या