मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणींना इम्प्रेस करायला बाईकवर बसवलं; स्टंट करतानाच झाली भलतीच फजिती अन्..., VIDEO

तरुणींना इम्प्रेस करायला बाईकवर बसवलं; स्टंट करतानाच झाली भलतीच फजिती अन्..., VIDEO

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका ठिकाणी अनेक लोक आपली स्पोर्ट्स बाईक घेऊन उभा आहेत. यातील एक मुलगा मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आपल्याजवळ बोलवतो

    नवी दिल्ली 05 डिसेंबर : सोशल मीडियाच्या (Social Media) दुनियेत प्रत्येकाला प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा आहे. काही लोक अजब कृत्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक फोटो आणि व्हिडिओवर लाईक मिळवण्यासाठी आपला जीवही धोक्यात टाकतात. विशेषतः युवकांमध्ये याची विशेष क्रेझ आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेल्या या गोष्टींमुळे अनेकांनी यश मिळतंही मात्र अनेकांनी फजिती होऊन बसते. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Stunt Video Viral) होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आजकाल लोकांना दिखावा करायला जास्त आवडतं. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक मुलगा स्पोर्ट्स बाईकच्या मदतीने मुलींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, शेवटी असं काहीतरी होतं की त्याच्यावरच लोक हसू लागतात. यानंतर आता तो स्टंट किंवा दिखावा करण्याचा प्रयत्न करण्याआधीही शंभर वेळा विचार करेल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका ठिकाणी अनेक लोक आपली स्पोर्ट्स बाईक घेऊन उभा आहेत. यातील एक मुलगा मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आपल्याजवळ बोलवतो आणि आपल्या बाईकवर बसण्यास सांगतो. मात्र इतक्यात असं काही घडतं जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्यक्ती स्टंट दाखवण्यासाठी रेस वाढवतो मात्र इतक्यात त्याचं नियंत्रण बिघडतं आणि त्याची बाईक सरळ शेजारी असलेल्या दुसऱ्या बाईकला जाऊन धडकते. हा व्हिडिओ ट्विटरवर The Darwin Awards नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओवर लोक निरनिराळ्या कमेंट करत आहेत. प्रत्येकाचं असंच म्हणणं आहे की तरुणांनी अशाप्रकारे आपला जीव धोक्यात टाकू नये. असे घातक स्टंट करणाऱ्यांपासून दूर राहायला हवं. एका यूजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हटलं की खरंच स्टंटबाजीच्या नादात लोक आपल्या जीवाची पर्वाही करत नाहीत. तर आणखी एकाने लिहिलं की हा जीवघेणा स्टंट होता. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Stunt video

    पुढील बातम्या