मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुत्र्यासोबत पंगा घेणं तरुणाला भोवलं; पुढच्याच क्षणी श्वानानं घडवली अद्दल, पाहा VIDEO

कुत्र्यासोबत पंगा घेणं तरुणाला भोवलं; पुढच्याच क्षणी श्वानानं घडवली अद्दल, पाहा VIDEO

हा व्हिडिओ हेच दाखवून देतो की वाईट काम करणाऱ्यासोबत वाईटच घडतं. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक मुलगा आपल्या कारच्या बाहेर एक स्टिक घेऊन उभा आहे

हा व्हिडिओ हेच दाखवून देतो की वाईट काम करणाऱ्यासोबत वाईटच घडतं. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक मुलगा आपल्या कारच्या बाहेर एक स्टिक घेऊन उभा आहे

हा व्हिडिओ हेच दाखवून देतो की वाईट काम करणाऱ्यासोबत वाईटच घडतं. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक मुलगा आपल्या कारच्या बाहेर एक स्टिक घेऊन उभा आहे

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 13 सप्टेंबर : असं म्हटलं जातं, की तुम्ही कोणासोबत वाईट केलं तर त्याचं फळ तुम्हालाही मिळतंच. कधी ते लगेचच मिळतं तर कधी काही दिवसांनंतर. सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ अनेक इन्स्टाग्राम यूजर्स आपल्या इन्स्टा हँडलवरुन शेअर करत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये असं नेमकं काय आहे, हे तुम्हीच पाहा. वैमानिक बॉयफ्रेंडनं फ्लाईटमध्येच केलं असं काही की लाजली प्रेयसी; रंगली चर्चा हा व्हिडिओ हेच दाखवून देतो की वाईट काम करणाऱ्यासोबत वाईटच घडतं. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक मुलगा आपल्या कारच्या बाहेर एक स्टिक घेऊन उभा आहे आणि त्याचा श्वान कारच्या दरवाजाच्या बाहेर खेळण्याच्या मूडमध्ये आहे. कुत्रा (Viral Video of Dog) स्टिक घेऊन येण्याचा आपला आवडता खेळ खेळण्यासाठी तयार होतो. मात्र, हा मुलगा कुत्र्यासोबत मस्ती करण्याचा विचार करतो. तो ही स्टिक आपल्या उजव्या बाजूला फेकण्याचं नाटक करतो आणि कुत्रा त्याच बाजूला धावत जातो. मात्र मस्ती करण्यासाठी मुलगा ही काठी डावीकडे फेकतो. हे पाहून गोंधळलेला कुत्रा पुन्हा मागे धावू लागतो.
काठी पकडण्यासाठी हा कुत्रा जोरात धावू लागतो. मात्र, पाठीमागे पाहत असलेल्या या मुलाला अंदाजही येत नाही की कुत्रा इतक्या लवकर मागे वळेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता की मुलाचं लक्ष नसतानाच कुत्रा अगदी वेगात येतो आणि या मुलाला धडकतो. यानंतर जाऊन कारच्या दरवाजाला धडकतो. ही धडक इतकी जोरदार होती, की मुलगा लगेचच जमिनीवर कोसळला. TikTok व्हिडिओसाठी महिलेनं स्वतःच्या लहान मुलीलाच छळलं; पतीनं घेतला मोठा निर्णय व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्यक्तीच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. काही लोकांनी म्हटलं की अशा वाईट कामांचं फळ देव लगेचच देतो. अनेकांनी कुत्र्याबद्दल चिंता व्यक्त करत म्हटलं, की या मुक्या प्राण्याची यात काय चूक होती. या व्यक्तीनं कुत्र्यासोबत असं का केलं, असा सवाल अनेकांनी केला आहे.
First published:

Tags: Funny video, Viral video on social media

पुढील बातम्या