मराठी बातम्या /बातम्या /Viral /ना बोलते, ना संवाद करते, चेहराही आहे भयानक; याची प्रेयसी पाहून तुम्ही घाबरुन जाल

ना बोलते, ना संवाद करते, चेहराही आहे भयानक; याची प्रेयसी पाहून तुम्ही घाबरुन जाल

क्रिस्टियन मोंटेनेग्रो आणि त्याची प्रेयसी

क्रिस्टियन मोंटेनेग्रो आणि त्याची प्रेयसी

एक अशी व्यक्ती या जगात आहे, ज्याचे कुटुंब खूप विचित्र आहे.

Man has weird family : घर आणि कुटुंबाचा विचार केला की, तुमच्या मनात एक शांतता येते आणि काही लोक ज्यांच्याशी तुम्ही आरामात बसून गप्पा मारू शकता आणि तुमचे सुख-दु:ख शेअर करू शकता. पण तुम्हाला कुटुंबात जर तुम्हाला असे काही सदस्य आढळले, जे तुमच्या शब्दांना अजिबात उत्तर देऊ शकत नाहीत, तर तुम्ही क्वचितच त्यांना सहन करू शकत नाही. पण अशी व्यक्ती या जगात आहे, ज्याचे कुटुंब खूप विचित्र आहे.

क्रिस्टियन मोंटेनेग्रो असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला एक प्रेयसी आहे. मात्र, ती अशी आहे की, जिच्यासोबत कोणताही सामान्य मुलगा काही ताससुद्धा घालवू शकत नाही. ती ना दिसायला सुंदर आहे, ना तिचा स्वभाव कळू शकतो. ती तुमच्या बोलण्याचं उत्तरही पाहू शकत नाही कारण ती मानव नाही आहे. क्रिस्टियन एका कापडाच्या बाहुलीच्या प्रेमात आहे, जिला तो अनेक वर्षांपासून आपली प्रेयसी मानतो आहे.

कपड्याच्या बाहुलीसोबत प्रेम -

कोलंबियामध्ये राहणारा क्रिस्टियन एका विचित्र कापडाच्या बाहुलीसोबत साखरपुडा केल्यामुळे चर्चेत आहे. त्याने तिचे नाव नतालिया ठेवले आहे आणि तिला आपल्या आयुष्यातील प्रेम असे म्हटले आहे. निर्जीव बाहुलीसोबत त्याने एक मुलगी आणि एक मुलगाही जन्माला घातल्याचा त्याचा दावा आहे.

क्रिस्टियन याने एक व्हिडिओ बनवला आणि बाहुलीच्या श्रमाचा आणि मुलाच्या प्रसूतीचा व्हिडिओ देखील पोस्ट केला, जो 3.5 दशलक्ष लोकांनी पाहिला. तो म्हणाला की, आता त्यांचे कुटुंब 3 मुलांसह 5 लोकांचे झाले आहे. एकटे राहण्याचा कंटाळा आल्यावर क्रिस्टियन ने बाहुलीला डेट करायला सुरुवात केली.

Love Marriageकेल्यावर तिनं त्याला गंडवलं, अशी अट ठेवली की, पतीने थेट पोलीस ठाण्यात धाव

महिलेकडेही आहे पतीच्या नावावर बाहुली -

तर दुसरीकडे क्रिस्टियनप्रमाणेच 37 वर्षीय मेरिव्होन रोचा मोरेसने एका औपचारिक समारंभात कापडापासून बनवलेल्या बाहुलीशी लग्न केले होते. यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात फोटो पोस्ट करून सांगितले होते की, ती देखील आपल्या मुलाची आई झाली आहे. या महिलेने अलीकडेच दावा केला आहे की, मूल झाल्यानंतर तिचा नवरा म्हणजेच गुड्डा (बाहुली) दुसऱ्या महिलेसाठी तिची फसवणूक करत आहे आणि तिच्याकडे याचे पुरावेही आहेत.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral news