Home /News /viral /

OMG! व्यक्तीने एकट्याने फस्त केले तब्बल 32 हजार Burger, शेवटी झाला असा परिणाम की... पाहा VIDEO

OMG! व्यक्तीने एकट्याने फस्त केले तब्बल 32 हजार Burger, शेवटी झाला असा परिणाम की... पाहा VIDEO

Man eat 32 thousand Burger for past 50 years : या व्यक्तीला बर्गर इतके आवडतात की असे दिवस क्वचितच असतील की त्याने बर्गर खाल्ला नाही.

    वॉशिंग्टन, 19 मे : बर्गर म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. किती तरी लोकांना बर्गर खायला आवडतं. आपल्याला कितीही बर्गर दिले किंवा रोज बर्गर दिले तरी आपण खाऊ असंही काही लोक म्हणतात. पण कितीही आवडत असला तुम्ही फार फार तर किती किंवा किती दिवस बर्गर खाऊ शकता? जरी तुम्ही म्हणाला की आपण कितीही बर्गर खाऊ शकतो, तरी एक वेळ अशी येईलच की जो बर्गर तुम्हाला इतका आवडतो त्याचाच तुम्हाला कंटाळा येईल (Man Burger eating record). म्हणजे तो नकोसा वाटेल. पण एका व्यक्ती मात्र इतके बर्गर खाल्ले आहेत, ज्याचा फक्त आकडा पाहूनच तुम्हाला चक्कर येईल (Man eat 32 thousand Burger for past 50 years). एका व्यक्तीने तरुण असताना बर्गर खायला सुरुवात केली ती म्हातारपणातही तो बर्गर खातोच आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या एकट्याने तब्बल 32 हजार बर्गर फस्त केले आहेत. त्याची बर्गर खाण्याची आवड आणि हौस यामुळे त्याचा हा सर्वात जास्त बर्गर खाण्याचा अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे (Guinness World Records). डॉन गोर्स्के (Don Gorske) असं या व्यक्तीचं नाव आहे. हे वाचा - 2 मुलं होताच लठ्ठ झाली बायको; नवऱ्याने तिच्या शरीरावर 'चाकू' फिरवला आणि झाला चमत्कार यूएसमध्ये राहणाऱ्या डॉन यांनी 17 मे, 1972 साली त्यांनी पहिल्यांदा बर्गर खाल्ला होता. तेव्हापासून ते दररोज बर्गर खातात. 1999 साली 5,490 बिग मॅक खाऊन सर्वाधिक बिग मॅक खाणारी व्यक्ती म्हणून त्याने रेकॉर्ड केला आणि आता 50 वर्षांत त्यांनी  32,340  बिग मॅक खाण्याचा रेकॉर्ड केला आहे त्यांचा हा रेकॉर्ड ऑगस्टमधील 2021 पर्यंतच्या गणतीच्या आधारावर नोंदवण्यात आला आहे. असे दिवस क्वचितच आहे, ज्यावेळी त्यांनी बर्गर खाल्ला नाही. आपल्या लग्नाचा 50 वा वाढदिवसही त्यांनी विसकॉन्सिनच्या मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये साजरा केला. जिथं त्यांनी आपला सर्वात पहिला बर्गर खाल्ला होता. https://zeenews.india.com/hindi/off-beat/first-kicked-the-chair-and-then-the-groom-returned-crying-from-the-wedding-see-the-video/1189538 गोर्स्के सांगतात, दिवसाता जास्तीत जास्त ते दोन बर्गर खातात. याशिवाय दुसरा बर्गर त्यांनी खाल्लाच नाही. जेव्हा एखादी गोष्ट त्यांना आवडते, तेव्हा ते लवकर सोडत नाही. हे वाचा - हौशेपोटी महिलेने स्वतःच्या जिभेचे केले दोन तुकडे आणि आता...; Shocking Video 50 वर्षांतील फक्त 8 दिवस असे होते, जेव्हा त्यांनी बर्गर खाल्ला नाही.  त्यांना बर्गर इतका आवडतो की याचे रॅपरही त्यांनी जमा करून ठेवले आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food, Lifestyle, Record, Viral, World record

    पुढील बातम्या