मुंबई, 27 ऑगस्ट : गुलाबजाम (gulabjamun) म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. कुणाच्या लग्नाला गेलो किंवा एखाद्या पार्टीला गेलो आणि तिथं वाटीभर गुलाबजाम घेणारा एक तरी व्यक्ती आपण पाहतोच. सध्या सोशल मीडियावर (social media) अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल (video viral) होतो आहे. ज्याने वाटीभर नाहीत तर ताटभर गुलाबजाम घेतले आहेत. विशेष म्हणजे त्याने हे गुलाबजाम काही मिनिटांतच फस्त केले आहेत.
एका फेसबुक युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीच्या ताटातील निम्म्याहून अधिक भाग गुलाबजामनेच भरला आहे आणि ताटाच्या अगदी कोपऱ्यात थोडासा भात आणि आमटी आहे. एक, दोन, तीन....ताटात नेमके किती गुलाबजाम आहेत हे मोजतानाही आपल्याला कंटाळा येईल, ही व्यक्ती मात्र ते बकाबक खाते आहे.
व्हिडीओत पाहू शकता. तोंडात टाकलेला एक गुलाबजाम संपत नाही तर ही व्यक्ती दुसरा गुलाबजाम खाते. असं एक-एक करून सर्व गुलाबजाम ही व्यक्ती फस्त करते, तेदेखील काही मिनिटातच. इतक्या वेळेत कुणाचं जेवूनही होत नसेल. तितक्या वेळेत ही व्यक्ती ताटभर गुलाबजाम संपवते. व्हिडीओ पाहिल्यानंतर अरे बाबा! बस कर आता किती खाशील, असंच वाक्य तुमच्या तोंडातून येईल.
हे वाचा - VIDEO : 62 व्या वाढदिवशी तब्बल 62 किमी धावला; तरुणांनाही लाजवेल असा वृद्धाचा जोश
दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे, कधीचा आहे आणि ही व्यक्ती इतकी मिठाई कोणत्या समारंभात खात आहे हे माहिती नाही. मात्र नेटिझन्सना व्हिडीओ खूप आवडू लागला आहे. यावर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्याला परावनगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढे अधिक लोकांचा जास्त खर्च नको म्हणून अनेक जण लॉकडाऊनमध्येच लग्न आटोपत आहेत आणि अशा व्यक्तींमुळे ते शक्य होऊच शकत नाही, असं काहींनी म्हटलं आहे.
हे वाचा - वटवाघळांचा स्वॅग! कोरोना काळात भन्नाट डान्समुळे नेटकरी झाले फॅन, पाहा VIDEO
कोरोनामुळे गेल्या काही महिन्यात लग्नसोहळ्यातलं जेवण खायला न मिळाल्याची कसर ही व्यक्ती एकाच दिवशी भरून काढते आहे, तसंच मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्यातील इतर व्यक्तींची कसर ही व्यक्ती भरून काढते की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral videos