मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Yuck! 'डोळे-कान-नाकातील घाण काढतो आणि...', BF च्या विचित्र सवयीला वैतागली GF; सोशल मीडियावर मागितली मदत

Yuck! 'डोळे-कान-नाकातील घाण काढतो आणि...', BF च्या विचित्र सवयीला वैतागली GF; सोशल मीडियावर मागितली मदत

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडच्या विचित्र सवयीबाबत सोशल मीडियावर सर्वांना सांगितलं आहे.

    मुंबई, 28 जुलै :  कपल म्हटलं की त्यांच्यामध्ये काही ना काही कारणावरून वाद होतात. त्यांच्या सर्वच सवयी जुळतात असं नाही, त्यांना एकमेकांच्या सर्वच सवयी आवडतील असं नाही. यामुळे त्यांच्यात खटके उडतात. पण एका तरुणाला इतकी विचित्र आणि घाणेरडी सवय आहे की शेवटी त्याच्या वैतागलेल्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर मदत मागितली आहे. त्याची सवय फक्त वाचूनच तुम्हाला उलटी येईल. प्रत्येकाला काही ना काही वाईट सवय असतेच. कुणी नाकात बोटं घालतं, तर कुणी नखं चावतं. पण तुम्हालाही ऐकून धक्का बसेल या तरुणीच्या बॉयफ्रेंडला डोळे-कान-नाकातील घाण खाण्याची सवय आहे. तुम्हाला फक्त वाचूनच धक्का बसला पण... त्यापेक्षाही धक्कादायत म्हणजे तुम्ही-आम्ही जे ऐकूनही किळस येतो, ते त्याला सामान्य वाटतं. असे आणखी काही लोक करत असल्याचा दावाही त्याने केला आहे. हे वाचा - प्रेमी जोडप्याची न्यूड होऊन भटकंती; महिला म्हणते, कपडे असल्यावर अस्वस्थ वाटतं त्याच्या या सवयीमुळे आता त्याच्या गर्लफ्रेंडलाही त्याला झेलणं मुश्किल झालं आहे. तिने त्याची ही सवय सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच झालं नाही. शेवटी वैतागून ती सोशल मी़डियावर व्यक्त झाली. Mumsnet नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलेने हे सर्व शेअर केलं आहे. जिथं तिनं सर्वांना आपल्या बीएफच्या सवयीबाबत सांगितलं. मिररच्या रिपोर्टनुसार महिलेने सांगितलं, कुणाचा पार्टनर डोळे-कान-नाकातील घाण खातो का? माझा पार्टनर डोळे-नाकातील घाण, कानातील मळ खातो. जेव्हा मी त्याला असं करण्यापासून रोखलं तेव्हा तो हे सामान्य असल्याचा म्हणाला. अनेक लोक असं करतात असं तो सांगतो. महिलेने आता याबाबत सोशल मीडियावर लोकांची मदत, सल्ला मागितला आहे. बहुतेकांनी बॉयफ्रेंडच्या या सवयीचा बिलकुल स्वीकार करू नये, अशा घाणेरड्या व्यक्तीला सोडूनच द्यावं, असा सल्ला दिला आहे. हे वाचा - VIDEO - आधी चोप चोप चोपलं नंतर कुंडीने फोडलं डोकं; कॅफेबाहेर तरुणीची तरुणाला बेदम मारहाण तुमच्या ओळखीतील किंवा जवळची व्यक्ती असं काही करत असेल तर तुम्ही काय कराल, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Boyfriend, Couple, Girlfriend, Viral

    पुढील बातम्या