Home /News /viral /

आता काय म्हणावं! सुंदर दिसण्याच्या नादात तरुणाने चक्क साबणच कचाकचा चावून खाल्ला; VIDEO VIRAL

आता काय म्हणावं! सुंदर दिसण्याच्या नादात तरुणाने चक्क साबणच कचाकचा चावून खाल्ला; VIDEO VIRAL

साबण सामान्यपणे आपण शरीरावर लावतो पण कधी कुणी साबण खाल्ल्याचं ऐकलं आहे का? 

    मुंबई, 24 जून : आपण सुंदर दिसावं असं कुणाला वाटत नाही. फक्त तरुणीच नाही तर तरुणांनाही असं वाटतं. सुंदर दिसण्यासाठी लोक काय काय नाही करत. वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्स, ट्रिटमेंट, थेरेपी घेतल्या जातात. काही साबणामुळेही सौंदर्य टिकवता किंवा खुलवता येतं, अशा दावा करणाऱ्या जाहिरातीही केल्या जातात. त्वचेवर हा साबण लावल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात, त्वचा उजळते, मुलायम होते. पण एका तरुणाने तर सुंदर दिसण्याच्या नादात चक्क साबणच कचाकचा चावून खाल्ला आहे (Man eating soap video). सौंदर्य खुलवण्यासाठी फक्त बाह्य उपाय करून फायदा नाही. शरीराच्या आतीलही सौंदर्य महत्त्वाचं असतं. यासाठी योग्य आहार, व्यायाम गरजेचा असतो. पण या तरुणाने मात्र शरीराच्या आतील सौंदर्याचा कदाचित वेगळाच अर्थ घेतला. बाह्य सौंदर्य खुलवण्यासाठी वापरला जाणारा साबण त्याने चक्क खाल्ला. साबण खाणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हे वाचा - आश्चर्य! 4 वर्षांच्या चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू, मुलगा मात्र ठणठणीत; पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता तरुणाच्या समोर बरेच साबण आहेत. साबणाच्या बॉक्समधील तो साबण काढतो आणि खातो. गाजर, मुळा खावा तसा तो साबण कचाकचा चावून खातो. साबणासोबत बाजूला स्पंज आहे, ज्यावर साबणाचा फेस आहे. हा तरुण मध्येच तो फेस ज्युस, पाणी प्यावं तसं पिताना दिसतो. फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतून सुंदर होण्याचा प्रयत्न असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका युझरने सुंदर दिसण्याच्या नादात हा रुग्णालयात नक्की जाईल असं म्हटलं आहे. एका युझरने ही व्यक्ती जिवंत आहे का? अशीही विचारणा केली आहे. हे वाचा - हिरोगिरी आली अंगाशी! छातीला गुंडाळून पेटवले फटाके, धक्कादायक शेवट; VIDEO VIRAL साबणात बरेच केमिकल्स असतात. त्यामुळे साबण खाण्याचं तरुणाचं हे कृत्य खतरनाक आहे. त्यामुळे तुम्ही असं काही करू नका, असं आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking video viral, Viral, Viral videos

    पुढील बातम्या