अलबामा, 9 जानेवारी: अनोळखी व्यक्तींच्या (Unknown persons) गर्लफ्रेंडशी (girlfriend) फ्लर्ट (Flirt) करून एक तरुण (Youth) लाखो रुपये (Lakhs) कमावत (earning) असल्याची बाब समोर आली आहे. सोशल मीडियाचा सध्या सर्वत्र सुळसुळाट झाल्यापासून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे लक्ष वेधून घेण्याचा आणि पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असतात. कुणी व्हिडिओ बनवून, तर कुणी विविध कलागुण दाखवून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. यातच एका तरुणाने इतरांच्या गर्लफ्रेंडसोबत ऑनलाईन छेडछाड करून पैसे कमावण्याचा मार्ग शोधून काढला आहे. विशेष म्हणजे त्यात तो यशस्वी झाला असून त्याचा हा पूर्ण वेळ व्यवसाय बनला आहे. काय आहे प्रकार?अलबामात राहणारा झेवियर लॉंग नावाचा तरुण सध्या लाखोंची कमाई करत आहे. तो इतरांच्या गर्लफ्रेंडसोबत फ्लर्ट करतो आणि त्यांची गर्लफ्रेंड एकनिष्ठ आहे की नाही, त्याचा रिपोर्ट तरुणांना देतो. त्यासाठी तरुण त्याला पैसे देतात आणि हाच त्याचा पूर्ण वेळचा उद्योग बनला आहे. अशी झाली सुरुवातकाही वर्षांपूर्वी झेवियरला त्याच्या एका मित्राने गर्लफ्रेंडबाबत काही समस्या सांगितली होती. त्यावेळी त्याने मित्राला मदत करण्याच्या हेतून तिच्याशी अनोळखी व्यक्ती म्हणून गप्पा मारल्या आणि त्यामुळे मित्राची अडचण दूर झाली. आपला आनंद व्यक्त करत असताना मित्राने सोशल मीडियातून ही बाब जाहीर केली आणि सर्वांपर्यंत हा प्रकार पोहोचला. त्यानंतर झेवियरला इतर मित्रांचे फोन येऊ लागले आणि आपल्यालाही अशीच मदत करण्याची विनंती त्याचे मित्र करू लागले.
हे वाचा -
आलं व्यवसायाचं स्वरूपबघता बघता या कामाला व्यावसायिक स्वरूप आलं आणि झेवियरनं इतरांकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. या व्यवसायातून आता झेेवियरला महिन्याला दीड लाखांपेक्षा अधिक कमाई होते आणि पूर्ण वेळ तो हाच व्यवसाय करतो. ज्यांच्या गर्लफ्रेंडचा रिपोर्ट निगेटिव्ह असतो, त्यांच्याकडून घेतलेले पैसे मात्र तो परत करतो आणि ज्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह येतो, त्यांच्याकडून मात्र तो ठरलेली रक्कम घेतो.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.