मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भारीच! फक्त झोपूनच लखपती झाला तरुण; नेमके कसे कमावतो पैसे पाहा VIDEO

भारीच! फक्त झोपूनच लखपती झाला तरुण; नेमके कसे कमावतो पैसे पाहा VIDEO

झोपून पैसे कमावणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

झोपून पैसे कमावणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

झोपून पैसे कमावणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 28 फेब्रुवारी : असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही म्हण सर्वांनाच माहिती आहे. प्रत्यक्षात असं शक्य नाही हे आपल्याला माहिती आहे. पैसे कमवायचे म्हटलं की काही ना काही तरी काम करावंच लागतं. पण एक व्यक्तीने मात्र खरंच अंथरूणात राहूनच लखपती बनला आहे. झोपल्या झोपल्याच त्याने लाखो रुपये कमावले आहेत (Man earn money by sleeping).

ऑफिसमध्ये 8-9 तास काम करतानाही काही जणांना डुलकी लागते. पण या वेळेत ते झोपू शकत नाही. पण विचार करा तुम्हाला झोपण्यासाठीच पैसे मिळाले तर. या व्यक्तीने ते करून दाखवलं आहे. सुपर मेनस्ट्रीम नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात तरुण रात्री झोपतो. झोपताना तो आपला कॅमेरा ऑन ठेवतो आणइ सकाळी उठताच त्याच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झालेले असतात.

हे वाचा -  बापरे! पाण्याचा थेंब जरी पडला तरी जळते तरुणीची त्वचा; घाम आणि अश्रूंपासूनही धोका

सोशल मीडियावर झोपून पैसे कमवण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता युट्यूबरने आपल्या बेडजवळ मायक्रोफोन, कॅमेरा, लाइट आणि मॉनिटर लावला आहे. त्याला पाहण्यासाठी बरेच लोक लाइव्हस्ट्रीममध्ये येतात.

" isDesktop="true" id="673830" >

ही व्यक्ती कित्येक तास झोपते. त्यानंचर लोक त्याला एलेक्साच्या माध्यमातून गाणं वाचवून, मेसेज पाठवून, व्हिडीओ लावून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नव्हे तर त्याला पैसेही दान करतात. या यूट्युबरने सांगितलं की एका आठवड्यात तो एकचा सहा तासांचं यूट्युब लाइव्ह करून £2,000 म्हणजे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवतो.

हे वाचा - Adventure Sports साठी परदेशवारी कशाला? भारतातच आहेत ही BEST ठिकाणं

झी न्यूजच्या रिपोर्टनुसार यूट्युबवर स्लीम स्ट्रीम खूप प्रसिद्ध आहे. लोक या माध्यमातून हजारो, लाखो रुपये कमवत आहे. झोपेत पैसे कमवण्याचा हा मार्ग लोकांना खूप आवडला आहे.

First published:

Tags: Lifestyle, Money, Viral