Home /News /viral /

तरुणाने चुकून कचऱ्यात फेकली हार्ड ड्राईव्ह; झालेलं नुकसान ऐकून व्हाल शॉक, आता थेट NASA कडे मागितली मदत

तरुणाने चुकून कचऱ्यात फेकली हार्ड ड्राईव्ह; झालेलं नुकसान ऐकून व्हाल शॉक, आता थेट NASA कडे मागितली मदत

जेम्स हॉवेल्स (James Howells) नावाच्या या इंजिनिअरने चुकून हार्ड ड्राईव्ह कचऱ्यात फेकली (Man Dumped his Hard Drive in Garbage). यात एक क्रिप्टोग्राफिक प्रायव्हेट स्टोर होतं

  नवी दिल्ली 20 डिसेंबर : काही वस्तू आपल्यासाठी इतक्यात महत्त्वाच्या असतात की त्या हरवल्यास आपलं कशातच मन लागत नाही. ब्रिटनच्या वेल्समध्ये राहणाऱ्या एक आयटी इंजिनिअरसोबतही असंच घडलं. त्याची हार्ड ड्राईव्ह हरवल्याने तो इतका नाराज झाला की त्याने थेट नासाकडेच मदत मागितली. त्याने सांगितलं की या हार्ड ड्राईव्हमध्ये त्याच्या खजिन्याची चावीही लपलेली आहे. जेम्स हॉवेल्स (James Howells) नावाच्या या इंजिनिअरने चुकून हार्ड ड्राईव्ह कचऱ्यात फेकली (Man Dumped his Hard Drive in Garbage). यात एक क्रिप्टोग्राफिक प्रायव्हेट स्टोर होतं. यात असणारी चावी जेम्सकडे असलेल्या हजारो करोडोच्या खजिन्याची चावी होती. ही हार्ड ड्राईव्ह मिळाली तर हा व्यक्ती काही मिनिटातच श्रीमंत होईल. मात्र जर ती मिळाली नाही तर त्याला आयुष्यभर या गोष्टीचा पश्चाताप होईल. Viral : कोट्यवधींची किंमत असलेल्या या रेड्याची आहे मजा; मालकही करतोय सेवा The Sun च्या वृत्तानुसार जेम्स हॉवेल्स याने साल 2013 मध्ये चुकून न्यूपोर्ट वेल्समध्ये आपली हार्ड ड्राईव्ह कचऱ्यात फेकली होती. यात बिटकॉईनची (Bitcoin) प्रायव्हेट कीदेखील स्टोर होती. आज बिटकॉईनची किंमत इतकी जास्त वाढल्याने जेम्सकडील या बिटकॉईनची किंमत 340 मिलियन पाउंड म्हणजेच भारतीय रुपयांत 34,33,98,35,916 इतकी झाली आहे. इतके पैसे एखाद्या हार्ड ड्राईव्हमध्ये अडकले असल्यास सहाजिकच कोणीही माणूसन वेड्यासारखं ती शोधेल. हरवलेली हार्ड ड्राईव्ह शोधण्यासाठी जेम्स हॉवेल्स अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या डेटा एक्सपर्टची मदत घेत आहेत. जेम्सने स्थानिक प्रशासनाला ऑफर दिली की ते या पैशातील काही भाग कोविड रिलीफ फंडमध्ये दान करतील. मात्र, अधिकृतरित्या कोणीही त्यांची ही ऑफर स्वीकारली नाही. इतकंच नाही तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाऊन हार्ड ड्राईव्ह शोधण्याची परवानगीही त्यांना दिली जात नाहीये. जेम्सने जगभरातील इंजिनिअर्स, पर्यावरणवादी आणि डेटा रिकवरी विशेषतज्ञांकडे मदत मागितली आहे.

  कटू सत्य! शिक्षिका असताना होती गरीब, प्रोफेशन बदलल्यावर झाली गडगंज

  NASA सोबतच ते आता ऑनट्रॅक कंपनीचीही मदत घेत आहेत. डेटा रिकवरी फर्मचं असं म्हणणं आहे की जर ही ड्राईव्ह तुटली नसेल तर यातील 80 ते 90 टक्के डेटा रिकवर होण्याची शक्यता आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Nasa, Viral news

  पुढील बातम्या