मराठी बातम्या /बातम्या /Viral /कुत्र्याला दुचाकीला बांधून रस्त्यावरुन फरफटत नेत होती व्यक्ती, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

कुत्र्याला दुचाकीला बांधून रस्त्यावरुन फरफटत नेत होती व्यक्ती, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

या व्यक्तीला पडल्यानंतर या लोकांनी कुत्र्याची तपासणी केली असता कुत्रा गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे आढळले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला, जो थरकाप उडवणारा आहे. हा व्हिडीओ खूपच अमानवी आहे. यामध्ये एका व्यक्तीने कुत्र्याला आपल्या दुचाकीला बांधलं आणि रस्त्यावरुन फरफटत नेलं. आजूबाजूला उपस्थीत कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ आपल्या कॅमेरात कैद केला.

हा व्हिडीओ गाझियाबादमधील विजयनगर येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. येथे एका व्यक्तीने कुत्र्याला आपल्या दुचाकीला बांधून ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. माहिती मिळताच प्राणी प्रेमी संघटनेचे काही लोक तेथे पोहोचले, त्यांनी या व्यक्तीला तेथेच पकडले.

बिबट्या दररोज शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला आणि त्याला धक्काच बसला

या व्यक्तीला पडल्यानंतर या लोकांनी कुत्र्याची तपासणी केली असता कुत्रा गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे आढळले.

त्याने असं का कृत्य केलं असं जेव्हा त्या व्यक्तीला विचारण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की, या कुत्र्याने चार-पाच जणांना चावा घेतला आहे, ज्यामुळे त्याने रागाच्या भरात असं कृत्य करण्याचा विचार केला. ती व्यक्ती या कुत्र्याला नेवून कुठेतरी सोडणार होता.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, या चालकाने कुत्र्याला बांधून एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत नेले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking, Social media, Top trending, Viral