Home /News /viral /

आधी आईसाठी प्रियकराची किडनी घेतली, मग दाखवला खरा रंग; तरुणीचा कांड वाचून बसेल धक्का

आधी आईसाठी प्रियकराची किडनी घेतली, मग दाखवला खरा रंग; तरुणीचा कांड वाचून बसेल धक्का

उजिएल याने आपल्या गर्लफ्रेंडच्या आईला आपली एक किडनी दान केली (Man Donate Kidney to Girlfriend’s Mother). मात्र, यानंतर जे काही घडलं, ते हैराण करणारं होतं.

  नवी दिल्ली 18 जानेवारी : माणूस प्रेमात आंधळा होतो, असं म्हटलं जातं. ही केवळ एक म्हण असली, तरी एकदा खऱ्या आयुष्यातही याचा प्रत्यय येतो. प्रेमात पडलेले लोक आपला आनंद, सुख, आराम या सगळ्या गोष्टी हसत हसत सोडायलाही तयार असतात. मात्र, एक व्यक्ती आपल्या प्रेयसीसाठी असं काही करून गेला, जे जाणून तुम्हालाही समजले की त्याचं आपल्या गर्लफ्रेंडवर किती प्रेम असेल. मात्र, प्रेयसीने त्याला मोठा धोका दिला. द सन वेबसाईच्यया रिपोर्टनुसार, मेक्सिकोमध्ये राहणारा शिक्षक उजिएल मार्टिनेज याने नुकतंच आपल्या टिकटॉकवरुन एक धक्कादायक घटना शेअर केली. जी ऐकून सगळेच शॉक झाले. त्याने सांगितलं, की त्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या आईला आपली एक किडनी दान केली (Man Donate Kidney to Girlfriend’s Mother). मात्र, यानंतर जे काही घडलं, ते हैराण करणारं होतं. लग्नाला 2 वर्ष होऊनही प्रियकरावरील प्रेम नाही झालं कमी; तरुणीने उचललं मोठं पाऊल उजिएलने सांगितलं की त्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या आईला आपली किडनी दिली. मात्र, ऑपरेशननंतर एका महिन्यातच त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत ब्रेकअप केला आणि दुसऱ्यासोबत लग्न केलं. यामुळे या व्यक्तीला मोठा धक्का बसला. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो सोफ्यावर झोपलेला दिसत असून अतिशय नाराज आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि या व्यक्तीला दुःखी न होण्याचा सल्ला लोक देत आहेत. एका व्यक्तीने म्हटलं, की तुला दुःखी होण्याची गरज नाही. कारण या महिलेनं एका अतिशय उदार व्यक्तीला गमावलं आहे. दुसऱ्या एकाने या व्यक्तीला सल्ला दिला की आता आयुष्यात पुढे जा आणि अशा व्यक्तीला निवड जी तुला आपलं मानेल आणि तुझं कौतुक करेल.

  ही काय भानगड? म्हणे, 'माझं स्पर्म चोरीला गेलं', व्यक्तीची पोलिसात विचित्र तक्रार

  मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने या व्हिडिओनंतर आणखी एक नवा व्हिडिओही शेअर केला आहे. यात त्याने सांगितलं, की त्याचे आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत अजूनही चांगले संबंध आहेत. त्याने सांगितलं की मी आणि माझी एक्स गर्लफ्रेंड दोघंही इमोशनली बरोबर आहोत. मला तिच्याबद्दल काहीही तक्रार नसल्याचं त्याने म्हटलं. आम्ही आता एकत्र नसलो तरीही एकमेकांचा तिरस्कार करत नसल्याचं त्याने सांगितलं.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Love story, Viral news

  पुढील बातम्या