मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मोठ्या ऐटीत नदीमध्ये सुसाट नेली बुलेट बाईक आणि...; कुछ तुफानी करण्याच्या नादात बाहेर पडली हिरोगिरी

मोठ्या ऐटीत नदीमध्ये सुसाट नेली बुलेट बाईक आणि...; कुछ तुफानी करण्याच्या नादात बाहेर पडली हिरोगिरी

बाईकसोबत पाण्यात स्टंट करणं तरुणाला पडलं महागात.

बाईकसोबत पाण्यात स्टंट करणं तरुणाला पडलं महागात.

बाईकसोबत पाण्यात स्टंट करणं तरुणाला पडलं महागात.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 30 नोव्हेंबर : बाईक हातात आली की बऱ्याच तरुणांच्या अंगात जणू फिल्ममधील हिरोच संचारतात. तरुण बाईकवर जीवघेणे स्टंट (Stunt video) करताना दिसतात. लोकांना आपली स्टाईल दाखवण्याच्या नादात स्वतःसोबतच जीवघेणे असे खेळ खेळतात. प्रसिद्ध होण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतात. अशाच एका बाईक स्टंटचा व्हिडीओ (Bike stunt video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे (Man stunt on bullet).

एका तरुणाने बुलेट बाईकसोबत स्टंट (Man stunt on bullet bike) केला आहे. त्याने बुलेट सुसाट चालवत थेट नदीत नेण्याचा प्रयत्न केला. जशी त्याने बाईक पाण्यात नेली त्याच्या दुसऱ्याच क्षणी त्याची हिरोगिरी बाहेर पडली. त्याचा स्टंट त्याच्यावरच भारी पडला.

व्हिडीओत पाहू शकता स्टाईल मारण्यासाठी त्याने नदीत बुलेट वळवताच त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटून तोल सुटला आणि बुलेटसह पडला. त्याचं डोकं खाली आणि पाय वर झाले. धाडकन तो तोंडावरच आपटला.

हे वाचा - गरागरा फिरत उंच जाणाऱ्या झोपाळ्यावर खतरनाक स्टंट; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे माहिती नाही. najar_singh_1322  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. असे स्टंट करण्यासाठी खूप प्रॅक्टिस करायला हवी, असे खतरनाक स्टंट करताना शंभर वेळा विचार करा, असा नेटिझन्सनी दिला आहे. तर काहींनी इन्श्युरन्स पेपर तर तयार ठेवले आहेत ना? अशा मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

हे वाचा - रोहित शेट्टीच्या चित्रपटांतील Real Action; अपघाताचा VIDEO पाहून धक्काच बसेल

याआधी अकोल्यात एक तरुण पावसाच्या पाण्यातून बाईक स्टंट करायला गेला होता. सकनी लोहगड मार्गाजवळ पूरसदृश्य परिस्थिती असताना या तरुणाने पुलावरून बाईक नेली.

पाण्याचा जोर असल्यानं तरुण आणि त्याची बाईक पाण्यात वाहून गेली.  या व्हिडिओत दिसतंय की तरुण कसा पाण्यात वाहून जात आहे. सुदैवाने तरुणाला पोहता येत असल्यानं त्यानं किनारा गाठला आणि तिथं उभे असलेल्या गावकऱ्यांनी त्याला मदतीचा हात दिला. या तरुणाचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे. नाहीतर अशी पावसाच्या पाण्यातून बाईक चालवण्याचा स्टंट जीवावर बेतला असता.

First published:

Tags: Bike accident, Bike riding, Stunt video, Viral, Viral videos