मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! नळाच्या वाहत्या पाण्यालाही त्याने कापलं; VIDEO मध्येच पाहा काय केली कमाल

OMG! नळाच्या वाहत्या पाण्यालाही त्याने कापलं; VIDEO मध्येच पाहा काय केली कमाल

मुठीतही धरता येत नाही, अशा नळाच्या वाहत्या पाहण्याचे व्यक्तीने कात्रीने दोन भाग केले.

मुठीतही धरता येत नाही, अशा नळाच्या वाहत्या पाहण्याचे व्यक्तीने कात्रीने दोन भाग केले.

मुठीतही धरता येत नाही, अशा नळाच्या वाहत्या पाहण्याचे व्यक्तीने कात्रीने दोन भाग केले.

मुंबई, 16 जून : नळाच्या वाहत्या पाण्याला आपल्या मुठीत धरण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने लहानपणी केलाच आहे. पण याच नळाच्या वाहत्या पाण्याला एका व्यक्तीने चक्क कापलं आहे. कात्रीने त्याने नळातून वाहणाऱ्या पाण्याचे दोन भाग केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हैराण झाला आहे.

पाण्याला तसं कुणीच पकडू शकत नाही. नळाच्या पाण्याला मुठीत धरता येत नाही. ओंजळीतही आपण पाणी घेतो पण ते फार वेळ ओंजळीत राहत नाही. एखाद्या भांड्यात, विशिष्ट जागेत साठवलं तरच पाणी एका ठिकाणी राहतं. नाहीतर पाण्याला आवरणं अशक्य. मग अशा वाहत्या पाण्याचे दोन भाग कुणी कसं काय करू शकतं, असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.

" isDesktop="true" id="565969" >

खरंतर हे फक्त सांगून, ऐकून, किंवा वाचून विश्वास बसणार नाही, त्यासाठी आधी हा व्हिडीओ पाहा.

हे वाचा - भरमंडपात दीराने नवरीसमोर केलं असं काही, थांबवावी लागले फेरे; नेमकं काय घडलं पाहा

व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती सुरुवातीला नळ चालू करते. नळातून पाणी वाहू लागतं. तेव्हा दुसऱ्या हातात कात्री धरून तो नळाच्या वाहत्या पाण्याला कापण्याचा प्रयत्न करतो. अरे हे काय? चक्क पाण्याचे दोन तुकडे झाले. नळातून वाहणाऱ्या पाहण्याचा एक भाग खाली बेसिनमध्ये कोसळला तर एक भाग मात्र नळालाच लटकत राहिला. जसा बर्फ जमा व्हावा तसं हे नळाचं पाणी जसं आहे तसंच राहिलं. त्याचं वाहणंही बंद झाला.

हे वाचा - मोठ्या कष्टानं घरात शिरला मात्र नाही आवरला अंघोळीचा मोह, चोराची झाली भलतीच फजिती

या व्यक्तीने नेमका कोणता इफेक्ट वापरला आहे माहिती नाही. पण त्याने अशक्यही शक्य करून दाखवलं आहे. एखादी जादूच वाटावी असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos, Water