मुंबई, 10 डिसेंबर : जगभरात विविध कला असणारी लोकं आहेत. अनेकजण आपल्या करामतींनी आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness world record) देखील नोंदवतात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल(Viral Video) होत असून यामध्ये व्यक्ती स्वतःचे केस कापताना दिसून येत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की ही व्यक्ती स्वतः कात्री आणि कंगव्याच्या मदतीने आपले केस कापत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे तर काहीजण याकडे कला म्हणून बघत आहेत.
सध्या ट्विटरवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून अवनीश शरण नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांची पसंती देखील या व्हिडिओला मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 24300 लोकांनी पहिले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि शेअर देखील केला जात आहे. हा व्हिडीओ शेअर करून अवनीशने ‘अद्भुत प्रतिभा’ असं देखील म्हटले आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, ही व्यक्ती सलूनमध्ये खुर्चीवर बसली असून स्वतः कंगवा आणि कात्रीच्या मदतीने आपले केस कापत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला सुरुवातीला ताशा वाजतो आणि नंतर टीव्ही सीरियल शक्तिमानचं (TV Serial Shaktimaan) टायटल साँग वाजतं. त्या गाण्यात जसं शक्तिमान हा अलौकिक आहे असं म्हटलंय तसंच हा केस कापणारा मुलगाही अलौकिक आहे असं त्यांना सुचवायचं आहे असं वाटतं आहे.
ही व्यक्ती अगदी सफाईदारपणे स्वतःचे केस कापताना दिसून येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तो कुणाचीही मदत घेताना देखील दिसत नाही. अगदी प्रोफेशनल व्यक्तीप्रमाणे आपले स्वतःचे केस कापून तो मोकळा होतो. 1 मिनिटे आणि 7 सेकंदाच्या हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चकित होऊ शकता. आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्याला हव्या त्या स्टाईलमध्ये हा व्यक्ती केस कापताना दिसून येत आहे. केवळ आपले केस हा व्यक्ती कपात नाही तर वस्तरा घेऊन आजूबाजूचे राहिलेले केस देखील स्वच्छ करत आहे. यामध्ये तो इतके सफाईदारपणे काम करत आहे की या दरम्यान त्याला कोणत्याही प्रकारची जखम देखील होत नाही. त्याला हवे त्याप्रमाणे तो आपले हात वळवून केस कापताना आणि वस्तरा चालवताना दिसून येत आहे.