मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! चक्क एका बोटाने केले कलिंगडाचे तुकडे; हा VIDEO पाहून व्हाल थक्क

OMG! चक्क एका बोटाने केले कलिंगडाचे तुकडे; हा VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की हा व्यक्ती आधी कलिंगडात टूथपिक घुसवतो. यानंतर केवळ आपल्या एका बोटानेच कलिंगडाचे तुकडे करतो

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की हा व्यक्ती आधी कलिंगडात टूथपिक घुसवतो. यानंतर केवळ आपल्या एका बोटानेच कलिंगडाचे तुकडे करतो

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की हा व्यक्ती आधी कलिंगडात टूथपिक घुसवतो. यानंतर केवळ आपल्या एका बोटानेच कलिंगडाचे तुकडे करतो

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 04 ऑक्टोबर : सध्या कलिंगड फोडणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की ही तर सामान्य बाब आहे, मग याच व्हायरल होण्यासारखं काय? मात्र, हा व्यक्ती जी ट्रिक वापरून कलिंगडाचे तुकडे करतो (Man Cut Watermelon by the Toothpick), ती हैराण करणारी आहे. मात्र, बहुतेक सोशल मीडिया यूजर्सचं असं म्हणणं आहे, की हे शक्य नाही. चला तर मग पाहूया की या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय आहे.

ओव्हर ब्रिजखाली अडकलं Air India चं विमान; सोशल मीडियावर व्हायरल होतोय VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की हा व्यक्ती आधी कलिंगडात टूथपिक घुसवतो. यानंतर केवळ आपल्या एका बोटानेच कलिंगडाचे तुकडे करतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, की इतक्या मजबूत कलिंगडाचे कोणी बोटाने तुकडे कसे करू शकतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर yournaturegram नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत 13 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

अवघ्या काहीच सेकंदांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी ही ट्रिक वापरून पाहिली. मात्र, हे शक्य नसल्याचं त्यांनी कमेंट करत म्हटलं आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की मी ट्राय केलं. मात्र माझं बोट तुटलं. दुसऱ्या एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, आमच्या देशातील कलिंगडासोबत असं काही केलं तर तुझा हात तुटेल.

आणखी एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की ही टूथपिकची कमाल नाही तर कलिंगडातच गडबड आहे. चीनी कलिंगड केमिकल वापरुन मोठी केली जातात. त्यामुळे ती अगदी पोकळ असतात. या यूजरचं असंही म्हणणं आहे, की सोशल मीडियावर अशा चीनी कलिंगडांचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.

युवकानं नवरी-नवरदेवाला उचललं अन् धाडकन जमिनीवर आपटलं, पाहा विचित्र VIDEO

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं, याचा अर्थ हे कलिंगड विषारी आहे, चुकूनही ते खाऊ नका. असे कलिंगड केमिकलचा वापर करून डेव्हलप केले जातात. त्यामुळे त्यांचा बाहेरचा भाग कमजोर असतो. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, ही तर कमालच झाली. एका टूथपिकच्या मदतीनं कलिंगडही फोडता येतं.

First published:

Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media