Home /News /viral /

VIDEO : व्यक्तीचं लक्ष नसताना अचानक मागून आला भलामोठा सिंह आणि...; कॅमेऱ्यात कैद झालं भयंकर दृश्य

VIDEO : व्यक्तीचं लक्ष नसताना अचानक मागून आला भलामोठा सिंह आणि...; कॅमेऱ्यात कैद झालं भयंकर दृश्य

सिंह आणि माणसाचा अचानक आमनासामना झाला पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे.

    मुंबई, 20 जून : सिंह, वाघ, बिबट्या असे खतरनाक प्राणी टीव्ही, व्हिडीओमध्ये पाहिले तरी आपल्याला भीती वाटते (Animal videos viral). पण तरी या प्राण्यांना प्रत्यक्षात पाहण्याचीही उत्सुकता असते. त्यामुळे कित्येक लोक नॅशनल पार्क किंवा जंगल सफारीवर जातात. अशावेळी आपलं लक्ष नसताना तो प्राणी अचानक समोर आला तर काय होईल? फक्त कल्पना करूनच तुम्हाला घाम फुटला ना... असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Lion comes closer to man in jungle video). जंगल सफारीवर गेलेल्या एका व्यक्तीचं लक्ष नसताना अचानक त्याच्या मागून एक भलामोठा सिंह आला. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे (Man comes face to face with lion viral video). माणूस आणि सिंहाचा आमनासामना झाल्यानंतर पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची किंवा पाहण्याची उत्सुकताही आता तुम्हाला असेल. @TheFigen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत शकता एक व्यक्ती गाडीच्या पुढे एका खुर्चीवर बसली आहे. हातात कॅमेरा घेऊन ती एका दिशेला पाहते आहे. जंगलात कुणी प्राणी दिसतोय आहे, याची प्रतीक्षा ती करते आहे. काही क्षणाने ती व्यक्ती आपली मान वळवते आणि त्यानंतर तिला धक्काच बसतो. हे वाचा - पुणे: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची धडपड; पाहा VIDEO कारण या व्यक्तीच्या मागून एक भलामोठा सिंह आलेला असतो. सिंह अगदी व्यक्तीच्या समोर येऊन उभा राहतो. व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून तो पाहतो. सिंहाला असं अचानक पाहून ती व्यक्तीही थरथर कापताना दिसते. तिला घामच फुटतो. तिच्या हातांच्या हालचालीवरूनच ती किती घाबरली आहे ते दिसतं. सिंहाने या व्यक्तीवर हल्ला केला की सिंहापासून ही व्यक्ती बचावली हे या व्हिडीओत दाखवण्यात आलेलं नाही. एका युझरने हा व्हिडीओ पाहताना कमेंटमध्ये पुढे नेमकं काय घडलं असा प्रश्न विचारला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या युझरने सिंह तिथं थांबला नसेल तो निघून गेला असेल असं म्हटलं आहे. कारण सिंहाला फिरायला आणि एखाद्या गोष्टीकडे एकटक पाहत राहायला आवडतं. सिंहही शिकार करण्याचा मूडमध्ये नव्हता. त्यामुळे उभा राहून तो फक्त त्या व्यक्तीला पाहत राहिला. तर एका युझरने जर माणसाने प्राण्यांना दुखापत केली नाही, तर तेसुद्धा माणसांचं काही नुकसान करत नाही, असं म्हटलं आहे. हे वाचा - Viral Video: कुत्र्यानं केला प्रँक, मालकाची झाली 'ही' अवस्था; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटलं? हा व्हिडीओचा शेवट काय झाला असावा असं तुम्हाला वाटतं. ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या