Home /News /viral /

स्टंटच्या नादात घडली भयानक दुर्घटना; कारला धडकून हवेत उडाली दुचाकी, अपघाताचा Shocking Video

स्टंटच्या नादात घडली भयानक दुर्घटना; कारला धडकून हवेत उडाली दुचाकी, अपघाताचा Shocking Video

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकी चालवत स्टंट करताना दिसत आहे. तो त्याच्या दुचाकीचं पुढचं चाक हवेत उचलतो आणि अतिशय खतरनाक स्टंट करण्याचा प्रयत्न करतो

  नवी दिल्ली 03 मे : आजकाल सोशल मीडियावर अनेक असे स्टंट व्हिडिओ (Stunt Video) पाहायला मिळतात, जे थक्क करणारे असतात. निरनिराळ्या स्टंटचे आणि यासोबतच अॅडव्हेंचर्स गेमचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्याही चांगलेच पसंतीस उतरतात. मात्र, अनेकदा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात लोक असे स्टंट करतात, ज्यामुळे त्यांचा जीवही धोक्यात येतो. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती बाईकवर जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान त्याच्यासोबत मोठी दुर्घटना घडते. माकडाला त्रास देणं महिलेला भोवलं; प्राण्यानं केस ओढून मारहाण करत केली भयंकर अवस्था, VIDEO सहसा अनेकदा तुम्ही सोशल मीडियावर असे व्हि़डिओ पाहात असाल ज्यात, लोक आपल्या गाडीचं पुढचं किंवा मागचं चाक उचलून केवळ एका चाकावर वेगात गाडी चालवत स्टंट करतात. मात्र हे किती घातक आहे याचा विचारही त्यांनी केलेला नसतो. सध्या असाच स्टंट करण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा भयंकर अपघात झाल्याचं पाहायला मिळतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Accident Video) झाला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by 7'nci Vites (@7ncivites)

  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकी चालवत स्टंट करताना दिसत आहे. तो त्याच्या दुचाकीचं पुढचं चाक हवेत उचलतो आणि अतिशय खतरनाक स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्‍ये पुढे पाहायला मिळतं, की बाईकचा वेग जास्त असल्‍यामुळे त्‍याला बॅलन्स सांभाळता येत नाही, त्‍यामुळे तो समोरून येणा-या कारला धडकतो. यात कारचंही भरपूर नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. VIDEO: जबरदस्ती तरुणाच्या गळ्यात साप टाकून पैसे मागू लागला गारूडी; पुढे जे घडलं ते धक्कादायक व्हिडिओमध्ये बाईकची कारसोबत जोरदार टक्कर होताना दिसत आहे. बाइक अगदी वेगात या कारला जाऊन धडकते आणि मग हवेत उडून बाजूला पडते. या अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bike accident, Stunt video

  पुढील बातम्या