मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वृद्धानं कुत्र्याला ओंजळीनं पाजलं पाणी, VIDEO VIRAL

वृद्धानं कुत्र्याला ओंजळीनं पाजलं पाणी, VIDEO VIRAL

व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारचे शब्द नाहीत. पण त्या व्हिडीओमध्ये जो अर्थ आहे तो शेकडो शब्दांच्या पलिकडचा आहे.

व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारचे शब्द नाहीत. पण त्या व्हिडीओमध्ये जो अर्थ आहे तो शेकडो शब्दांच्या पलिकडचा आहे.

व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारचे शब्द नाहीत. पण त्या व्हिडीओमध्ये जो अर्थ आहे तो शेकडो शब्दांच्या पलिकडचा आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

25 फेब्रुवारी, प्रतिनिधी : भूतदया नावाची गोष्ट ही फक्त बोलायची किंवा सांगायची, वाचायची नसते तर प्रत्यक्षात करायची असते. असंही म्हणतात की, तुमचं इथलं कर्तव्य पूर्ण झाल्याशिवाय तुमची सुटका होत नाही. अर्थात या गोष्टी प्रत्येकाच्या मानण्यावर आहेत. कदाचित तुम्हाला असाच अनुभव आला असेल किंवा नसेलही.

सध्या सोशल मिडीयात एक व्हिडीओ चर्चेत आहे. त्या व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारचे शब्द नाहीत. पण त्या व्हिडीओमध्ये जो अर्थ आहे तो शेकडो शब्दांच्या पलिकडचा आहे. कारण तो व्हिडीओच तसा आहे, ज्याला कोणत्याही शब्दांची गरज नाही. जेंव्हा एखादी कृती आपल्या मनाला इतकी भिडते की आपल्याला काही सुचतंच नाही, तसंच काही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला होईल.

वाळवंटात तुपाची वाटी घेऊन एक संत महात्मा कुत्र्याच्या मागे धावल्याची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? भुकेनं व्याकूळ झालेला एक कुत्रा जेंव्हा संत नामदेवांया हातातली भाकरी घेऊन पळू लागतो, तेंव्हा नामदेव महाराज त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळतात. हा सगळा खेळ नदीकाठी सुरु असतो, तो सुद्धा भर उन्हात. हा प्रसंग असेल साधारण सातशे वर्षांपूर्वीचा. पण किर्तनकार जेंव्हा हा प्रसंग सांगतात तेंव्हा तो आपल्यासमोर जिवंत उभा राहातो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा व्हिडीओ फार जुना असेलही कदाचित किंवा नसेलही. पण त्यातला अर्थ, त्यातला भाव, त्यातलं न बोलता बरंच काही बोलणं, न शिकवता केलेली कृती हे सगळं आपल्या अगदी आतमध्ये पोहोचतं. या व्हिडीओतला म्हातारा आपल्या ओंजळीने कुत्र्याला पाणी पाजतोय. रस्त्यावरून फिरणारा एक मुका प्राणी. त्याला पाणी पाजणारा तो वृद्धाकडे इतर काही नसलं तरी जी भूतदया त्यानं दाखवली त्याला तोड नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही. पण प्राण्यांनाही तहान-भूक असते. त्यांची भाषा आपल्याला कळत नसली तरी त्यांची गरज मात्र आपण भागवू शकतो असंच काहीसं या व्हिडिओतून दिसतं.

रोमँटिक डेटमध्ये चोराची एंट्री, बंदूक उगारत चोराच्या मागे धावलं पोलीस दाम्पत्य

अज्ञात आधुनिक नामदेव

First published:

Tags: Viral