Home /News /viral /

घरात झाडू मारता मारता पोहोचला पोहोचला जंगलात, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

घरात झाडू मारता मारता पोहोचला पोहोचला जंगलात, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

व्यंकटेश सुब्रमण्यम नावाच्या ट्वीटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून मे महिन्याअखेरपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये शाळ, महाविद्यालयं, कार्यालयं, कंपन्या, कारखाने सगळंच बंद होतं. जून महिन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात हळूहळू हा लॉकडाऊन उठवण्यात आला. या मिळालेल्या वेळाचा वापर अनेकांनी आपलं घरकाम करण्यासाठी तर काहींनी ऑनलाइन क्लास करण्यासाठी तर काहींनी निव्वळ झोपण्यासाठी घालवला. अनेकांनी घराची साफसफाई आणि स्वच्छता केली. अशाच एका तरुणाचा साफसफाई करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या तरुणानं आपल्या खोलीतून साफसफाई करायला सुरुवात केली होती आणि सफाई करता करता जंगलात पोहोचल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हे वाचा-दुकानं उघडलं म्हणून पोलिसांनी जमिनीवर आपटून केली बेदम मारहाण, VIDEO VIRAL व्यंकटेश सुब्रमण्यम नावाच्या ट्वीटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आसाममधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. आतापर्यंत ट्विटरवर हा व्हिडीओ 10 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर 6, 8000 लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ 13 सेंकदाचा आहे. यामध्ये तरुण एका खोलीपासून साफाइ करायला सुरुवात करतो आधी खोली मग जीना मग घर मग त्याला सगळीकडे कचरा दिसायला लागतो आणि हा कचरा उचलताना तरुण जंगलापर्यंत पोहोचत असल्याचं सांगितलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या