मराठी बातम्या /बातम्या /Viral /

छोट्याशा लाकडी फळीवरुन सायकल चालवत होता तरुण; तोल जाताच पाण्यात पडला उताणा, पाहा Viral Video

छोट्याशा लाकडी फळीवरुन सायकल चालवत होता तरुण; तोल जाताच पाण्यात पडला उताणा, पाहा Viral Video

सोशल मीडियावर (Social Media) सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात पाहायला मिळतं, की एक व्यक्ती काहीतरी वेगळा स्टंट करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी तो एका अत्यंत लहान लाकडी फळीवरुन सायकल चालवत आहे

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 18 ऑगस्ट : दुनियेत अनेक टॅलेन्टेड आणि विविध कौशल्य असणारी लोकं आहेत. मात्र, अनेकदा काहीजण काहीतरी वेगळं करण्याच्या नादात स्वतःच संकटात सापडतात. काही लोक तर यासाठी स्वतःच्या जीवाचीदेखील पर्वा करत नाहीत. प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेकदा असे लोक स्वतःवरच मोठं संकट ओढून आणतात. नंतर याचीच मस्करी केली जाते. सध्या असाच एक व्हिडिओ (Video Viral on Social Media) समोर आला आहे. यात दिसतं, की एक युवक अतिशय कठीण रस्त्यावर सायकल (Cycle Stunt Video) चालवत आहे. मात्र, थोड्याच वेळात त्याच्यासोबत जे घडलं त्याची त्यानं कल्पनाही केली नसेल. VIDEO: महिला रिपोर्टरचा तो प्रश्न ऐकून हसू लागले तालिबानी, कॅमेरा केला बंद सोशल मीडियावर (Social Media) सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात पाहायला मिळतं, की एक व्यक्ती काहीतरी वेगळा स्टंट करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी तो एका अत्यंत लहान लाकडी फळीवरुन सायकल चालवत आहे. या फळीच्या खाली खोल पाणी आहे. सायकल या फळीवरुन चालवताना तो अत्यंत सावधगिरी बाळगत आहे. मात्र, अखेर तोल बिघडतो आणि तो सायकलसोबतच या पाण्यात कोसळतो. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि अनेकजण हा व्हिडिओ शेअरदेखील करत आहेत. VIDEO : कॅन्सरच्या उपचारानंतर 2 चिमुकल्या जिगरी दोस्तांची भावुक करणारी पहिली भेट ट्विटरवर हा व्हिडिओ ‘@HldMyBeer’ नावाच्या हँडलवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला अत्यंत मजेशीर कॅप्शनही दिलं गेलं आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 34 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. सोबतच अनेकजण या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही करत आहेत. एका यूजरनं व्हिडिओ पाहिल्यानंतर लिहिलं, की काहीतरी वेगळं करण्याच्या नादात लोक स्वतःचंच हसू करून घेतात. तर, दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की लोक असलं काहीही का करतात हे समजत नाही. हे माहिती असूनही की असल्या फालतू स्टंटबाजीमुळे अनेकांचा जीवही गेला आहे.
First published:

Tags: Funny video, Stunt video

पुढील बातम्या