मराठी बातम्या /बातम्या /Viral /दहाव्या मजल्यावर अडकलेल्या मांजरीला वाचवायला गेला व्यक्ती, पण...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

दहाव्या मजल्यावर अडकलेल्या मांजरीला वाचवायला गेला व्यक्ती, पण...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Cat Viral Video: व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही मांजर जाळीमध्ये अडकत नाही आणि दहाव्या मजल्याहून खाली कोसळते. मांजर खाली पडतानाचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो.

Cat Viral Video: व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही मांजर जाळीमध्ये अडकत नाही आणि दहाव्या मजल्याहून खाली कोसळते. मांजर खाली पडतानाचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो.

Cat Viral Video: व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही मांजर जाळीमध्ये अडकत नाही आणि दहाव्या मजल्याहून खाली कोसळते. मांजर खाली पडतानाचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो.

नवी दिल्ली 18 डिसेंबर : अनेक लोक लहान प्राण्यांच्या जीव वाचवण्याला फार महत्त्व देत नाहीत. मात्र, अनेक लोक असेही असतात जे या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आपला जीवही धोक्यात टाकतात. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात एका व्यक्तीने आपला जीव धोक्यात टाकत, रेल्वे ट्रॅकवर उभा असलेल्या कुत्र्याचा जीव वाचवला होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ (Video Viral on Social Media) समोर आला आहे, ज्यात एका व्यक्तीने दहाव्या मजल्यावर अडकलेल्या एका मांजरीला वाचवण्यासाठी अथक प्रय़त्न केले (Man Saves Life of a Cat). पुढे जे काही घडलं ते पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

मैत्रिणीलाच लग्नात प्रवेश नाकारला; नवरीच्या निर्णयामागचं कारण वाचून चक्रावाल

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की इमारतीच्या दहाव्या मजल्यावर एक मांजर अडकलेली आहे. या मांजरीला वाचवण्यासाठी एक व्यक्ती धावून आला. तुम्ही पाहू शकता की या व्यक्तीने एका मोठ्या काठीला जाळी बांधलेली आहे आणि तोा मांजरीला वाचवण्यासाठी गेला आहे. मात्र यानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्हीही घाबराल.

View this post on Instagram

A post shared by Animal cute (@animal000love)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही मांजर जाळीमध्ये अडकत नाही आणि दहाव्या मजल्याहून खाली कोसळते. मांजर खाली पडतानाचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. मात्र शेवटी जे होतं, ते पाहून तुम्हालाही बरं वाटेल. मांजरीला वाचवण्यासाठी चार लोक खाली मोठी चादर घेऊन उभा राहिलेले असतात. ही मांजर थेट यात जाऊन पडते.

तुम्ही पाहू शकता की चादरीत पडल्यामुळे मांजरीला काहीही होत नाही आणि तिचा जीव वाचतो. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.

या अतिविषारी सापाच्या सौंदर्यावर फिदा झाले लोक; यात असं आहे तरी काय? पाहा VIDEO

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर animal000love नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, मांजरीला वाचवल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ 1 कोटीहून अधिकांनी लाईक केला आहे. तर आतापर्यंत 23 करोडहून अधिकांनी पाहिला आहे.

First published:

Tags: Cat, Shocking viral video