Home /News /viral /

दैनंदिन वापरातील या गोष्टीमुळे होणार जगाचा अंत? या व्यक्तीनं केला भविष्यातून परतल्याचा दावा

दैनंदिन वापरातील या गोष्टीमुळे होणार जगाचा अंत? या व्यक्तीनं केला भविष्यातून परतल्याचा दावा

स्वतःला टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller) सांगणाऱ्या जॉननं भविष्य पाहिल्याचा दावा केला होता. त्यानं म्हटलं की 2036 मध्ये जगाचा अंत होईल

    नवी दिल्ली 03 ऑक्टोबर : जगभरात असे अनेक लोक आहेत जे भविष्यातून (Man Returns From Future) परतल्याचा दावा करतात. काहींचं असं म्हणणं आहे, की उल्कापातामुळे जगाचा अंत होईल. तर काहींचं असं म्हणणं आहे, की एलियन्स जगाचा नाश करतील. आता सोशल मीडियावर (Social Media) जॉन टिटोर नावाच्या व्यक्तीची भविष्यवाणी व्हायरल होत आहे. जॉननं सांगितलं, की तो साल 2036 (Man Returns From 2036) मधून परतला आहे. सोबतच त्यानं जग संपताना पाहिलं आहे. जगाचा अंत होण्याचं कारण कॉमप्युटर (Computer) असणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. पैशांसाठी काहीही! ATMसमोर डोकं टेकलं, हात जोडले; तरुणीने काय काय केलं पाहा VIDEO स्वतःला टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller) सांगणाऱ्या जॉननं भविष्य पाहिल्याचा दावा केला होता. त्यानं म्हटलं की 2036 मध्ये जगाचा अंत होईल. आजपासून 20 वर्षापूर्वीच त्यानं दावा केला होता, की लवकरच जगात एक महामारी पसरेल. आता कोरोनाचा प्रसार झाल्यानं अनेकांना जॉनच्या दाव्यावर विश्वास बसू लागला आहे. जॉन एक अमेरिकी शिपाई आहे, जो आता सेवानिवृत्त झाला आहे. जॉनचं म्हणणं होतं, की त्याला अमेरिकी सरकारनं एका गुप्त प्रोजेक्टअंतर्गत टाईम ट्रॅव्हल प्रोजेक्टवर कामासाठी लावलं होतं. याच्या माध्यमातून तो 1975 मध्येच भविष्यात गेला होता. पुढे जगाचा अंत कसा होईल, हे त्याला आधीपासूनच माहिती आहे. जॉननं सांगितलं, की त्याच्या वडिलांना कॉमप्युटरच्या दुनियेत विशेष शोध लावले होते. याच कारणामुळे अमेरिकी सरकारनं भविष्यात जाण्यासाठी त्यालाच निवडलं. तिथे त्यानं पाहिलं की 2036 मध्ये जगाचा अंत होणार आहे. याच कारण कॉमप्युटर बनेल. जगाच्या अंतासोबतच त्यानं महामारीबाबतही दावा केला होता, जो खरा ठरला. यानंतर आता लोक जॉनवर विश्वास ठेवू लागले आहेत. मेहुणीला पाहताच सुटला भावोजींच्या मनाचा ताबा, सर्वांसमोरच केला धिंगाणा; VIDEO जॉननं भविष्य पाहिल्याचे आणखी काही दावे केले होते. यात त्यानं सांगितलं होतं, की तिसरं महायुद्ध 2015 मध्ये सुरू होईल. मात्र, ही भविष्यवाणी चुकीची ठरली. त्यानं असा दावा केला होता, की भविष्यात दोन सुपरवापर देश आपसात भिडतील आणि तीन बिलियन लोकांचा मृत्यू होईल. यासोबतच अमेरिकेत गायीच्या माध्यमातून एक आजार पसरणार असल्याचा दावाही त्यानं केला होता. 2036 पर्यंत हा आजार हाहाकार माजवेल, असं त्याचं म्हणणं होतं. लोक आता त्याच्या दाव्यांची चर्चा करत आहेत. मात्र, जॉन आपल्या या दाव्यांनंतर गायब झाला आहे, त्याला अद्याप कोणीही शोधू शकलेलं नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral news

    पुढील बातम्या