मुंबई, 27 जून : सिंह म्हटलं की भल्याभल्या प्राण्यांना घाम फुटतो मग माणसांचं काय
(Lion video viral). सिंहाला प्रत्यक्षात काय व्हिडीओत पाहूनही भीती वाटते. प्रत्यक्षात पाहण्याची कितीही इच्छा असली तरी सिंह समोर दिसला तरी मुद्दामहून त्याच्यासमोर जाण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही. पण एका व्यक्तीने ती हिंमत केली. आपल्या गाईवर सिंहाने हल्ला करताच तिला वाचवण्यासाठी एक व्यक्ती चक्क सिंहाशीही भिडली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Man chase lion eating his cow viral video).
बिबट्या मानवी वस्तीत घुसून लहान मुलांना पळवून नेल्यानंतर आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी बिबट्याशी भिडणाऱ्या आईची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण एका मुक्या जीवासाठी आपला जीव कोण बरं धोक्यात घालेल. पण मुक्या जीवासाठीही आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या डेअरिंगबाज तरुणाचा हा व्हिडीओ.
व्हिडीओत पाहू शकता एका सिंहाने एका गाईवर हल्ला केला. त्याचवेळी गुराख्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं. गाईला वाचवण्यासाठी गुराखी धावत आला. आपल्यासमोर सिंह आहे, याचीही त्याने पर्वा केली नाही. फक्त गाईला वाचवण्यासाठी त्याने स्वतःचाही जीव धोक्यात घेतला. थेट मृत्यूसमोरच धावून गेला. हातात भाला घेऊन तो सिंहाला मारायला गेला.
हे वाचा - बापरे! तरुणाने चक्क सिंहालाच केल्या गुदगुदल्या; काय परिणाम झाला तुम्हीच पाहा VIDEO
आता सिंह हा जंगलाचा राजा. प्राणी असो माणून त्याच्यावर शिकारीसाठी तो तुटून पडतो. पण इथं मात्र माणसाचं असं रूप पाहून सिंहही घाबरला. आपल्या समोरील इतकी मोठी शिकार सोडून तो आपला जीव वाचवण्यासाठी धूम ठोकून पळाला. व्हिडीओत पाहू शकता जसं समोरून माणसाला धावत येताना सिंहाने पाहिलं तसा तो दूर पळून गेला. इतका दूर गेला की पुन्हा परतून येण्याची हिंमत त्याने केली नाही.
मसाई सायटिंग्स (Maasai Sightings) नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आफ्रिकेच्या केन्यातील मसाई आदिवासी समाजातील हा तरुण आहे. सामान्यपणे सिंह कुणालाच घाबरत नाही. पण मसाई समाजाची सिंहांमध्ये खूप दहशत आहे.
हे वाचा - Superhero Dog! चक्क छोट्याशा श्वानाने चक्रीवादळाला थोपवलं; नैसर्गिक आपत्तीपासून शहराला कसं वाचवलं पाहा VIDEO
व्हिडीओ पोस्ट करताना दिलेल्या माहितीनुसार मसाई लोक सिंहाचं रक्षण करतात पण जर त्यांना नुकसान होत असेल तर त्याची शिकार करायलाही ते घाबरत नाही. त्यांच्या शिकारीमुळे सिंहही त्यांना घाबरतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.